Pages

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

सोशल मिडीयाचे प्रोफाईल पिक्चर / DP........!

सोशल मिडीयाचे प्रोफाईल पिक्चर / DP........!

आजकाल प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह आहेत.  त्यातील सर्वांसाठीच एक गोष्ट खूप महत्वाची झाली आहे ती म्हणजे प्रोफाईल पिक्चर / DP.
अनेकजण आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून काही वेळ हा चांगल्या प्रकारचा  प्रोफाईल पिक्चर / DP(फोटो) कसा मिळेल हे शोधत असतात.  शोधायलाच पाहिजे ! त्यात गैरदेखील काय आहे. शेवटी आपले सौंदर्य दुरर्याला दाखवून आणि लोकांच्या कमेंट ने जर त्यात आनंद मिळेत असेल, समाधान मिळत असेल तर काय वाईट.

आज प्रत्येकजण कुठेही गेला तरी अनेक फोटो काढतो परंतु त्यातील बेस्ट फोटो हा आपला फेसबुक  प्रोफाईल पिक्चर किंवा whatsapp प्रोफाईल पिक्चर / DP ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

अनेकजण दररोज ते बेस्ट फोटो मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.
कारण शेवटी अप्रत्यक्षरीत्या जग आपले त्यावरून व्यक्तित्व ठरवत असत. भलेही आपण रिअल लाईफमध्ये कसेही असाल .

अनेक व्यक्ती एकमेंकांप्रती एट्र‍ॅक्ट होण्याचे कारण देखील हेच असतात.  व्हाटस अप वरचे DP तर खूप मोठी भूमिका पार पाडतात. 
आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये सुंदर आणि प्रसन्न चेहरे आहेत हे आपल्या कॉन्टॅक्ट मधल्या व्यक्तींनी स्पेशली मुलींनी  DP बदलल्या वरच आपल्याला कळत . इतर वेळी आपण एव्हड़ लक्ष देत नाही. DP बदलल्यावर ते ठळक पणे लक्षात येते.

ज्या व्यक्तींचे एकाद्या व्यक्तीप्रती आकर्षण किंवा वन साईडेड प्रेम वगेरे असेल तो DP बदलण्याची वाटच बघत असतो.  DP बदल्यानंतर  nice DP हि कमेंट फिक्स आणि त्यांनतर तिकडून आलेला thanks हा reply, मग पुढची बोलणी चालू . त्यामुळे DP म्हणजे अनेकांसाठी बोलन्यासाठी एक उत्तम बहाणा आहे असे बोलले तर वावगे ठरणार नाही.

  तर काहींना एरव्ही  कोणाचे लक्ष नसते  म्हणुनच DP बदलावा लागतो त्या अनुशंगाने तरी कोणीतरी लक्ष देत हेही एव्हढंच खरं आहे.
असे अनेक फॅक्ट आहेत..... 

काहीही असो परंतु यामुळे प्रत्येकजन चांगले राहण्याचा किंवा तशाप्रकारे वावरण्याचा प्रयत्न तरी करत आहेत.

परंतु शंका हीच आहे कि ज्या प्रकारे या प्रोफाईल पिक्चर / DP(फोटो) मध्ये दिसणाऱ्या व्यक्ती किंवा व्हर्चूल जगात वावरणाऱ्या व्यक्ती खरच रिअल लाईफमध्ये तशा असतात का ? ❓

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा