Pages

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

वाढदिवस पार्ट्या.....!

Anyone don’t take personally

प्रिय..........,

सकाळी मित्राने उपलोड केलेले फोटो सहज पहिले, मीही होतो त्या फोटोंमध्ये. परंतु थोडे त्यावर आधारित एक दुसरी बाजू जाणवली आणि त्यात मला अपघातानंतरच्या अनुभवानंतर प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू लगेच डोळ्यासमोर यायला सुरुवात होत आहे.    

एकीकडे ग्रामीण भागात जुन्या संस्कृतीचे जतन होत असताना दुसरीकडे शहरी भागात पाश्चात्य संस्कृतीचे झटपट अनुकरण होताना दिसत आहे.

त्यात नवीन आलेले फेड वाढदिवसाच्या पार्ट्यांचे.... अहोरात्र कष्ट करून ग्रामीण भागतील आईवडील मुलाला शिकण्यासाठी शहरात पाठवतात. परंतु तिथे गेल्यावर त्याला शहरी पाणी लागते आणि त्याचे रूपच बदलते गुणांखेरीज.

चार चौघ उनाड  मित्र मैत्रिणींना घेऊन पार्ट्या करायच्या आणि तेही मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन ,ज्यात म्हणायला गेले तर एक महिन्याची एका मुलाची खानावळीचे पैसे क्षणार्थात चकनाचूर होतात आणि त्यात output काय शून्य फक्त मजा.

हि मजा करणे अयोग्य असे माझे म्हणणे नाही परंतु हि गोष्ठ प्रत्येकाला करावी लागते त्याची ऐपत असेल नसेल तरी..

बड्या बापाच्या पोरांचे ठीक आहे परंतु माझ्या तुम्हासारख्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे काय तेही करतातच.
जे पैसे आपल्या आईबापांना कमवायला एक महिना लागतो तितकी रक्कम आपण एका वेळेत कुठलाही मागचा पुढचा विचार न करता खर्च करतो.

पण याची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण दोन पैसे कमवायला लागतो.
जेव्हा मीही दोन पैसे कमवायला लागलो तर जाणवले शौक तो मां-बाप के पैसो से पुरे होते है ,अपने पैसो से तो सिर्फ जरुरते पुरी होती है.

मी तर असे म्हणेल कि जरुरते पण नाही पुरी होत. जेव्हा तोच पैसा आपण कमवतो तेव्हा तो इतका काटकसरीने व जबाबदारीने वापरतो कारण त्या पैशाची किंमत आपल्याला कळलेली असते. आठ-नऊ तास सावलीत बसून पुढे म्हणेल कि a.c. मध्ये बसून मिळालेल्या फुटकीभर कवडी मोलाचे आपण किती जपून वापर करतो तोच विचार आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत का करत नाही.

   माझ्या बाबतीतली एक गोष्ठ नक्की सांगेल माझ्या पार्ट्यांमध्ये जेवणारी सगळेच माझ्या संकट समयी चार पाच दिवस अहोरात्र माझ्या बरोबर माझ्या पाठीशी होते परंतु त्याला पार्ट्यांची परतफेड म्हणता येणार नाही तर आपले मित्रांवरती आणि त्यांचे आपल्या स्वभावावर आपल्यावर  असलेल्या प्रेमामुळे. त्यामुळे पैसा खर्च केला तरच व्यक्ती जवळ येतात हा घोड गैसमज आहे. आणि असा करून कुणी घेऊही नये.

जेव्हा एकाद्या मित्राची परिस्थिती नसेल तेव्हा का इतर त्याला बोलत नाही कि तू एक चहा जरी पाजला तरी ती आम्हाला पार्टीसारखाच आहे आणि तो स्वताही का असे सांगू शकत नाही हे मला अजुनहि कळले नाही.

आई बापाचा किंवा तुम्हा स्वताचा भरपूर पैसा विधायक नाही तर विदारक कामासाठी खर्च करायचा आणि वरून बडेजाव पना दाखायचा हे काय उपयोगाच. जेव्हा तुमच्याकडे असेल तेव्हा गोष्ठ वेगळी आहे.

मीही धुतल्या तांदळासारखा आहे असे मी म्हणणारच नाही कारण मीही अनेक अश्या बर्थडे पार्ट्यांमध्ये हेड ऑफ द टेबल बसलो आहे. परंतु तेव्हाही थोडं चुकीच वाटत होत पण थोडंसच परंतु तो एक काळ असतो आणि त्यात आपण वाहवत जातो. ह्या गोष्ठी करायला नाही पाहिजे असे माझे म्हणणेच नाही आहे परंतु व्यक्तीनुसार त्याचे स्वरूप चेंग झाले पाहिजे असे माझे म्हणणे.

असो शेवटी ओ भी एक दौर था ये भी एक दौर है किती दिवस त्या स्थिर स्थावर असलेल्या संकृतीच्या जाळ्यात अडकून पडायचे. त्यातून बाहेर येऊन स्वचंद भरारी घ्यायची आहेच परंतु आपला आपणंच विचार करून कि आपण कोण आहोत आपण कुठून आलो आहोत, आपल्याला कोठे जायचे आहे आणि आपण काय करत आहोत.

 What do you want …Finally choice is yours………………!