Pages

शुक्रवार, २३ जून, २०१७

गावरान शब्द

मी घाटी !!

आमच्या घाटावर जी बोलीभाषा आहे तीने मराठी भाषेला अनेक शब्द बहाल केले आहेत .
गावाकडे नियमीत वापरातले काही शब्द, तसेच आता फक्त वयोवृद्ध लोकं जे शब्द वापरतात असे काही शब्द  आम्ही संग्रहीत करन्याचा प्रयत्न केला आणि त्या शब्दांच्या अर्थांसह हे आपल्या समोर मांडताना आनंद होईल.

ही माहीती संकलीत करताना  " आपन म्हसवंडीकर " या आमच्या गावच्या व्हाट्स समुहाची फार मदत झाली .

माझा  घाटावरचा सोडुन मोठा मित्र परीवार आहे .
त्यांच्यासाठी तर अभ्यास करावी अशी माहीती आहे ही .

आणि काही मंडळी अशीही असतील ज्यान्नी कधीतरी हे शब्द ऐकलेले आहेत , बोललेले आहेत पण हल्ली ते असे शब्द वापरत नाही , त्यांना हा संग्रह बघून विशेष आनंद होईल .

अस्सल घाटी / पठारी  शब्द

१) मोक्कार - मुबलक , भरपूर
२) मायंदाळ - प्रचंड
३) केंदुळ - बराच वेळापासुन
४) कवाचं - कधीच , केंव्हाच
५) रेटुन -  जोर देउन
६) आवाळ - घट्ट
७) येळमाळं - दिवभर
८)कोड्यास - भाजी
९) त्यांठ - तीकडे
१०) लवान - खोलगट भाग
११) चिवाळ - अरुंद भाग
१२) पुचकान - बिनकामाचे
१३) चऱ्हाट - रस्शी , दोरी
१४) गुळचाट - गोड
१५) सवसान - सायंकाळ
१६) चावनाट - जिभेचे चोचले असलेला
१७) बादड - दव
१७) जिब्ड - जीप , कार
१८ ) पुराड -
१९) द्वाड -  वाईट
२०) थेंबाट - पाउस
२१) पहाळी / पाळ्ही - पावसाची सर
२२) वंगाळ - कुरुप
२३) बुरुंगाट - रीमझीम पाउस
२४) गदाळ - खराब
२५) वावार - शेत
२६)उली उली - जरा जरा
२७)ह्यांद्र - वेडा
२८) हेंबुड - वेडा
२९)इप्पारं - वेडपट
३०) म्होरं - पुढे
३१)जितराब - जनावरे
३२) बर्गडी - एक हाड
३३) कराळ - उतरता
३४) उत्याळ - उथळ
३५) सवसांच - संध्याकाळी
३६) पेताड - मद्यपी
३७) हेपास्ल - मस्तीखोर
३८) लपाटन -
३९) बर्हाणी - उडनटप्पु
४०) लुगड - साडी
४१) वटकावणं - तेकु
४२) सटमाळं
४३) रेमटावल , बदकावल - मारणे
४३) दोबाड - म्हैस
४४) खापुर्ड , शेपुर्ड - शेळी
४५) गावड - गाय
४६)यंगराट - वात्रट
४७) लुगारं - कमकुवत
४८) बंडी - शर्ट
४९) गुणोरोक -
५०) वट्टा - ओटा
५१) फोकाटी , शेमटी - बांबु
५२) झाड्याला - शौचाला
५३) निबार - वयस्कर व्यक्ती
५३) कव्हर - कीती वेळ
५४) वाताड - कड्क झालेलं
५५) दाभाड - तोंड
५६) फिंदार्ड , फिंद्री - मुलगी
५७) चघाळ - जनावरांच उरलेल अन्न
५८) भगुलं - पातेलं
५९) पीतळी - जेवनाचे ताट
६०) बैतवार - व्यवस्थीत
६१) येरवाळी - वेळेत
६२) औंदा - यावर्षी
६३) भलतुषा - खोडकर
६४) किडुक - साप
६५ ) मुंडीच्या काट्यावर - डोक्यावर पडणे
६६) वाखं , चिचकुळ - धारदार
६७) वाडगं - गोठा

संकलन - किरण बोडके

शुक्रवार, १६ जून, २०१७

Master's _सेमिनार

#Master's _सेमिनार.

मेघ मुलांची शाळा भरली शिक्षक त्यांचा वारा,
चला मुलांनो सेमिनारची सहल काढूया दिवस आहे बरा।।

वाऱ्यांसारखे PG- coordinator आमचे मेघांसारखे गाईड,
नभासारख्या रेपोर्टवर साईन नसतानाही घेई आमची साईड।।

वादाळासारखा External फाडफाड विचारू लागला Questioन,
वाऱ्याच्या मंदझुळुकी सारखे त्यांचे शब्द ऐकत होते आमचे कान काहीपण।।

गप्प बसून ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता आम्हा,
कारण माहित होते यासाठी शक्यतो यावे लागणार नाही पुन्हा।।

काहीच व्यवस्थित रिसर्च नसूनही सेमिनार देऊन येत आहेत सर्व,
जसे सुरु होणार आहे त्यांच्याच आनंदाचे नवे पर्व।।

शेवटी सर्वात महत्वाचे समाधान व आनंद आहे सर्वांच्या चेहऱ्यावर,
आता नाचत गात निघणार आहोत आम्ही आपापल्या वाटेवर।।

✍🏻गणेश सातकर