Pages

शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

स्वप्रयात्नातून डिजिटल क्रांती

स्वप्रयात्नातून डिजिटल क्रांती आणि डिजिटल गाव....!

सह्याद्रीच्या कुशीत, डोंगरदर्यांमध्ये वसलेले, संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी परिसर म्हणजे निसर्गाने दोन्ही हातांनी उधळलेल्या अनुपम सौन्दर्यांचे जणू एक शिल्पच म्हणावे लागेल.
या सुंदर शिल्पाच्या मुकुटात खोचलेला शिरपेच म्हणजे आपल्या गावासाठी गावातील सर्वच स्तरातील नागरिकांनी केलेलं अनोख कार्य.

मूळताच परिस्थितीजन्य संकटांनी वेढलेले हे गाव. संकटेही अशी कि सर्वसाधारण विचार केला तर त्यावर मात करणेही तितकेच अवघड आणि अशक्य. परंतु म्हणतात ना प्रयत्न आणि इच्छाशक्ती असली कि कुठलिही कामे आणि आव्हाने खुजी वाटतात.
अगदी तसच काहीतरी या गावाने आणि तेथील नागरिकांनी करून दाखवले आहे.
गावच्या नागरिकांचा संपूर्ण सहभागाणे एक यशस्वी पाणलोट प्रकल्प राबवण्यात आला आणि या प्रकल्पामुळे कधीकाळी पाण्यासाठी वणवण करणारे गाव आज सुजलाम सुफलाम झाले आहे. प्रकल्पहि असा पूर्ण केला कि गाव तर स्वयंपूर्ण झाले परंतु पाणलोटाचे असे मॉडेल उभ्रारले कि याचा अभ्यास संपूर्ण देशाने केला आणि अजूनही करत आहे. (आमीर खानच्या पाणी फौंडेशन उभारणीतहि खारीचा वाटा – एक उदाहरण)
यालाच जोड मिळाली गावच्या महिलांची....ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्हावी या हेतूने महिला बचत गट स्थापन झाले. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला संपूर्ण पणे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झाल्या. 

संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा असं संघटन आणि या संघटनातून साधलेला परीसरीचा उत्कर्ष , विकास हे सामान्य घरातून आलेल्या महिलांनी, त्यांच्या एकोप्यातून , संघटनेतून विविध आदर्श निर्माण केले याची दखल घेत देशपातळीवरच नव्हे तर विदेशातूनहि याचे कौतुक केले जात आहे.
पाणलोटच्या माध्यमातून पाण्याने सुजलाम झालेले असो किंवा मळादेवी महिला विकास समितीच्या अंतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून खरी आपल्या पायावर उभी राहिलेली म्हसवंडीची महिला असेल यापुढे जाऊन मागील पिढीने घेतलेला वसा पुढे चालवण्यासाठी  नौकरीनिमित्ताने गावाबाहेर मुंबई, पुणे सारख्या शहरात गेलेल्या तरुणांनी विसंवादातून सुसंवादाकडे गेलं की सुधारणांची किमया कशी साध्य होऊ शकते हे या तरुणांनी दाखवून दिलं आणि एका व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या मातृभूमीचा विकासासाठी एकत्र येऊन आकाराला आले एकता फौंडेशन नावाचे विचार मंच... सामाजिक उपक्रमाची एक छोटी संस्था.
या माध्यमातून तरुणांनी अनेक सामाजिक कार्य केले आहे आणि वयक्तिक शक्य तेव्हढे कार्य करण्याचा प्रयत्नही प्रत्येक तरुण करत आहे. गावातील खर्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचे काम प्रत्येकजण आज करताना दिसत आहे. 




       आतापर्यंत ज्या गोष्टींचा अभाव आहे ते स्वप्रयत्नातूनच करण्याचा एक वेगळा ध्यास तरुणांनी घेतला आहे. गावातील दोन्ही शाळांमध्ये संगणक  सोय करून दिली असल्याने गावातील विद्यार्थी पहिलीपासून संगणक शिकत आहेत. अशा अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न हा गावातीलच तरुणांनी, नागरिकांनी केला आहे.
एक खेडे गाव जिथ परिस्थितीजण्य कारणामुळे साध्या मोबाईल नेटवर्कचाही अभाव, तसे पाहायला गेले तर लोकसंख्याही जेमतेम, नेटवर्क towar साठी अनेक प्रयत्न झाले आणि चालूही आहेत. सरकारी BSNL  ने पुढच्या तारखा देऊन देऊन, कारणे देऊन देउन हातच झटकले. Idea, Airtel कंपनीला वारंवार विनंती केल्यानंतर दोन सर्वे देखिल झाले परंतु टेक्निकल प्रोब्लेम आहे आणि त्यावर काम करावे लागेल तेव्हाच काहीतरी करता येईल अशी गेल्या दोन वर्षापासून चाललेली त्यांची प्रोसेस आहे.

अश्या सर्व गोष्टी असल्या तरी आज गावातील प्रत्येक घरातच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीकडे फिचर फोन आहेत कारण प्रत्येकाने त्यावर उपाय म्हणून प्रत्येकाच्या घरी आपले रेंज स्पॉट शोधून ठेवले आहेत. जग आधुनिकतेकडे जात असताना आम्हीही त्यासोबत जात आहोत त्यात अडचणी असल्या तरी त्यावर मात करून, हेच यातून सांगण्याचा प्रयत्न.
आज गावात त्यात निम्म्याहून जास्त लोकांकडे स्मार्टफोन आहेत. गावात डीजीधन योजनेअंतर्गत एक ऑनलाईन मिनी Nationalised  बँकिंग सिस्टीम आहे. गावातील रेशन धान्य आज पेपरलेस झाले आहे फक्त हाताच्या अंगठ्यावर डिजिटल मशिनद्वारे आज रेशन असेल, बँकिंग सुविधा असेल असे विविध कामे केली जातात.
आता इतक्या सुविधासांठी आणि ग्रामपंचायतचे कामकाज यांच्यासाठी खरी गरज होती ती एका सक्षम इंटरनेटची. तात्पुरते उपाय आणि पर्यायांवरच आतापर्यंत ह्या गोष्टी चालूं आहे. सरकारी मदतची वाट पाहत बसायचे झाले तर पुढील वीस वर्षात पण काही होऊ शकणार नाही हे सर्वांना माहित होत.

म्हणून अनेक दिवसांपासूनची तरुणांची संकल्पना होती कि गावामध्ये इंटरनेट आणता येईल परंतु त्याला अनेक टेक्निकली आणि आर्थिक अडचणी आहेत. परंतु या गोष्ठीला खंबीर साथ मिळाली ती ग्रामपंचायत म्हसवंडीची. ग्रामपंचायत ने पहिले ग्रामपंचायत डिजिटल करू या ध्ययाने पुढाकार घेऊन काही आर्थिक मदत देऊ केली.
  गावातील तरुणांचे वैशिष्ट्य आहे कि जो ज्या क्षेत्रात काम करत आहे त्याचे थोडेफार योगदान गावासाठी देतोच आणि त्याच धर्तीवर इंटरनेट ब्रॉडबंड क्षेत्रात काम करण्यार्या म्हसवंडीच्या अक्षय जाधव, महेश बोऱ्हाडे, गौरव बोडके या तरूंनांनी चार दिवस टेक्निकली मेहनत करून गावच्या मळादेवी मंदिराच्या जवळ उंच ठिकाणी एक इंटरनेटचा मिनी टॉवर उभारला आणि त्याच्या मदतीने गावामध्ये अजून दोन रीसीव्हर डीव्हाइस जोडून ग्रामपंचायत पूर्णतः वायफाय-डिजिटल केली. आणि याच माध्यमातून याच इंटरनेट क्षेत्रात काम करण्यार्या म्हसवंडीचा युवा उद्योजक हरिष बोडके याने संपूर्ण गावासाठी फ्री वाय फाय देण्याचा नामस ठेवला आहे. सर्वच तरुणांनी यासाठी यथोचित प्रयत्न केले आणि आज याच सर्व म्हसवंडीच्या तरुंनामुळे संपूर्ण गावात वाय फाय सुविधा होत आहे.

मोबाईल नेटवर्कची अभाव असलेल गाव आज अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं फ्री वाय फाय असलेले गाव झाले आहे. आजच संपूर्ण टेस्टिंग पूर्ण होऊन ते वापरासाठी सज्ज झाले आहे आणि येत्या १५ ऑगस्ट २०१७ योजी याचे लोकार्पण करण्यात येत आहे.  
आज खर्या अर्थाने गाव इंटरनेट च्या माध्यमातून डिजिटल झाले आहे. देशविदेशातून गावातील पर्यावरण व गावातील विविध कार्य  पाहण्यसाठी अनेक अभ्यासक येत असतात्त. आतापर्यंत दोन हजारहून अधिक देशाभरातून अभ्याससहली आणि तब्बल ४८ देशांच्या अभ्यासकांनी  गावाला भेटी दिल्या आहेत परंतु यापुढे येणारे अभ्यासक गावातूनच live उपडेट देऊ शकतील यात खरा आनंद आहे.

हे सर्व घडून येतंय तेथील नागरिकांमुळे, तरुणांमुळे, त्यांच्या विचारांमुळ, त्यांच्या एकीमुळे.
अशा विविध क्षेत्रात शून्यातून गरुडझेप घेऊन एका आदर्शवत गावाकडे वाटचाल करणारे असे हे म्हसवंडी गाव म्हणजे विकास आणि पर्यावरणरक्षण हातात हात घालून कसे पुढे जाऊ शकतात, याच एक उत्तम उदाहरण आणि त्याचा एक वस्तुपाठच म्हणता येईल.......!

  : - गणेश सातकर