Pages

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

पारावरच्या दगडाची आत्मकथा...!

येव्हाना वरील चित्र बघुन माझ्या गावकर्यान्नी मला ओळखलच असेल....... बरोबर !

तोच मी पारावरच्या कोपर्यातला ... एक दगड !!!!

.....................................................


मी एक दगड !!!


मी साक्षीदार आहे परीवर्तनाचा ,

मी साक्षीदार आहे सत्तांतराचा ,

मी साक्षीदार आहे प्रगतीचा .


मी पाहीलय पारतंत्र ,

मी पाहीलय स्वातंत्र ,


होय मी आहे एक दगड !!




मी ऐकल्या आहेत गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंत च्या राजकारणाच्या चर्चा ,


मी ऐकल्या आहेत आर्थीक मंदीपासुन ते राष्टाच्या संरक्षनाच्या चर्चा ,

मला कुठे काय चाललय याची इत्तंभुत माहीती सहज उपलब्ध होते .


मी कुणाची परम सुखे ऐकलीत तर मी हृदय पिळवटुन टाकनारी दुख: देखील ऐकलीत .

अनेकांची गुपीत फक्त मलाच माहीत आहेत .


तुम्हाला सांगु का माझा दिवस पहाटे 4 वाजताच चालु होतो .

पहाटे काकड आरतीला पहीली घंटा वाजली की मी जागा होतो .

आणि शेवटी रात्री 10-11 वाजता मला झोपायला मिळते .

दुपारच्या प्रहरास मला खुप एकट एकट वाटत , करमतच नाही .



आधी 
 


मी आहे एक

दगड पण माझा दर्जा एखाद्या सिंहासनापेक्षे कमी नाही .

या सिंहासनावर बसायला कुठलीही पात्रता नाही .

लहान - थोर , गरीब श्रीमंत

कोनीही बसु शकतो .


खरतर मी कुरुप , ओबड धोबड म्हणुन मला बाजुला काढल गेल .

भव्य अशी भिंत म्ह्णजेच पार झाला पण मला कुठेच जागा मिळाली नाही .

बाकीचे माझे बांधव मला हिनवत होते मी आपला हिरमुसुन बसलो होतो . माझ्याकडे दुसरा मार्ग देखील नव्हता .

सर्व काम झाले तरी मी कुठेच कामी आलो नाही याची खंत मनात होती.


नंतर 
मी ओबड धोबड होतो पण भरभक्कम होतो . कोनत्याच कारागीराला माझे महत्व पटले नाही.शेकटी काम झाल्यावर माझ काय करायच याच्यावर खलबत झाली . कोनी म्हटल याचे दोन तुकडे करा आणि वापरा ..कोन काय तर कोन काय बोलले ठीकसे आठवत देखील नाही .

पण कोनतरी बोलले याला द्या एका कोपर्यात ठेउन आणि मग मोठ्या चर्चेअंती मला जागा मिळाली आणि मी स्थीर स्थावर झालो .

माझी अशी जागा होती तीकडे धोका होता , सहसा कोन माझ्या जवळ देखील फिरकत नव्हते .

मी आपला आभाळाकडे बघत वेळ घालवत होतो , उजव्या बाजुला भला मोठा गव्हाळा डोंगर तर डाव्या बाजुला तळ्याचा माळ . असेच ह्या दोघांशी गप्पा मारत दिवस जात होते .


असाच एक दिवस अचानक कोनतरी माझ्याकर येउन बसला , दुसरा आला , तिसरा आला आणि रोजच येउ लागले .

सकाळ संध्याकाळ माझ्याजवळ गर्दि व्हायला लागली .


गावच्या सभा माझ्या सानीध्यात होउ लागल्या माझे महत्व वाढु लागले ..माझे बाकीचे सहकारी माझ्याकडे हेव्याने बघु लागले .

समाजातही असेच होते नाही का ? कोणाची किमंत कधी वाढु शकते याचा अंदाजही भल्याभल्यान्ना येत नाही .मी तसाच एक .


जो मझ्यावर बसायचा तोच जनुकाही सभेचा अध्यक्ष असच त्याला वाटायच.


गावात कधी कोनाला एकटेपना जानवला की तो इथेच येतो मला भेटायला .

कोनी बोलायला नसेल तरी सभोवताली नजर मारली की एक जिवंतपणा येतो. वेळ निघुन जाते.


काही वर्ष आधी, साधारण 15-20 वर्षापुर्वी जानेवारी संपला की माझ्या अजुबाजुला दिवस दिवस भर मानसांची गर्दी असायची .




गावात म्हणे पाणलोट आला आहे .

माझ्या बाजुलाच याची सभा झाली. अनेक गावकर्यांबरोबर मला देखील हे थोतांड वाटले .

पण लोकान्नी मनावरच घेतले होते .

दिवस दिवस भर माझ्या आजुबाजुला बसुन नको त्या विषयांचा काथ्याकुट करनारे लोक चक्क हातात टिकाव - फावडे घेउन डोंगरावर दिसायला लागले . आणि बघता बघता 5-10 वर्षात उघडे - बोडके डोंगर हीरवा शालु नेसु लागले .

मी देखील प्रसन्न झालो .


कीतीतरी दिवस या कायापालटाच्या गप्पा मी कान देउन ऐकु लागलो .


आणि मीच तो अभागी ज्याने हे नंदनवन होताना देखील बघीतले आणि आता ह्याच नंदन वनाचा विनाश होताना देखील बघतोय .

ज्यान्नी स्वताच्या हाताने खड्डे खांडुन झाडे लावली ..वाढवली त्याच लोकान्ना ती झाडे तोडताना बघुन खुप वेदना होतात .

पण करनार काय ??


गावात समृध्दी आली ...मग माझ्या सोबतीला तरुनांची संख्या कमी झाली . फार तर सकाळ - संध्याकाळ माझे तरुण मीत्र मला भेटायचे . दिवस भर असायचे माझे वृध्द सहकारी .

त्यांच्या वृध्दत्वाच्या कथा एकमेकान्ना सांगनारे .

माझे कितीतरी मित्र मला सोडुन गेले .

पण मी अजुनही आहे तसाच आहे .

मी कित्येकान्ना तरुण होताना पाहीले तर....

कित्येकान्ना म्हातारे होताना पाहीलय ....

कित्येकान्ना देवाघरी जाताना पाहीलय ....


इथेच बसुन स्वप्न रंगवली आणि ती साकार केली असेही माझे सहकारी आहेत ..

तर फक्त आणि फक्त ऐय्याशी , मौज मज्जा करनारे माझे जिवलग देखील मी पाहीलेत .

खुप शिकले ...आज आपल्या पायावर उभे आहेत अशे माझे मित्र खुप दिवसान्नी गावात आले की मला प्रचंड अभिमान वाटतो .

आणि कोनी कितीही मोठा झाला तरी गावात आल्यावर मला भेटल्याशीवाय जात नाही .


खुप काही आहे बोलायला पण बस्स...! बोलेल परत कधीतरी .


वर्षानुवर्ष एकाच जागेवर ,

अनेक उन्हाळे , पावसाळे ,

दुष्काळ , सुकाळ बघत .

अनेकांचे सुख - दुख: ऐकत ,

स्वताच्या जागेवर ठामपणे ,

निच्छिंत, आहे तसाच....


मी एक दगड ..पारावरचा ....!!!!!!


शब्दांकन - किरण शिवाजीराव बोडके

शुक्रवार, १० जानेवारी, २०२०

म्हसवंडी..! दुष्काळातून समृद्धीकडे ...! शॉर्ट डॉक्युमेंटरी..!

म्हसवंडी...!

पाणलोट प्रकल्प आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून दुष्काळातुन समृद्धीकडे...!

द आर्ट ऑफ लिविंग संस्थेने म्हसवंडी गावावर बनवलेली शॉर्ट डॉक्युमेंट्री.

यु ट्यूब लिंक :- https://youtu.be/duITyOz51pQ


!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!