Pages

भाषण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

पारावरच्या दगडाची आत्मकथा...!

येव्हाना वरील चित्र बघुन माझ्या गावकर्यान्नी मला ओळखलच असेल....... बरोबर !

तोच मी पारावरच्या कोपर्यातला ... एक दगड !!!!

.....................................................

मी एक दगड !!!

मी साक्षीदार आहे परीवर्तनाचा ,

मी साक्षीदार आहे सत्तांतराचा ,

मी साक्षीदार आहे प्रगतीचा .

मी पाहीलय पारतंत्र ,

मी पाहीलय स्वातंत्र ,

होय मी आहे एक दगड !!

मी ऐकल्या आहेत गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंत च्या राजकारणाच्या चर्चा ,

मी ऐकल्या आहेत आर्थीक मंदीपासुन ते राष्टाच्या संरक्षनाच्या चर्चा ,

मला कुठे काय चाललय याची इत्तंभुत माहीती सहज उपलब्ध होते .

मी कुणाची परम सुखे ऐकलीत तर मी हृदय पिळवटुन टाकनारी दुख: देखील ऐकलीत .

अनेकांची गुपीत फक्त मलाच माहीत आहेत .

तुम्हाला सांगु का माझा दिवस पहाटे 4 वाजताच चालु होतो .

पहाटे काकड आरतीला पहीली घंटा वाजली की मी जागा होतो .

आणि शेवटी रात्री 10-11 वाजता मला झोपायला मिळते .

दुपारच्या प्रहरास मला खुप एकट एकट वाटत , करमतच नाही .

आधी 
 
मी आहे एक

दगड पण माझा दर्जा एखाद्या सिंहासनापेक्षे कमी नाही .

या सिंहासनावर बसायला कुठलीही पात्रता नाही .

लहान - थोर , गरीब श्रीमंत

कोनीही बसु शकतो .

खरतर मी कुरुप , ओबड धोबड म्हणुन मला बाजुला काढल गेल .

भव्य अशी भिंत म्ह्णजेच पार झाला पण मला कुठेच जागा मिळाली नाही .

बाकीचे माझे बांधव मला हिनवत होते मी आपला हिरमुसुन बसलो होतो . माझ्याकडे दुसरा मार्ग देखील नव्हता .

सर्व काम झाले तरी मी कुठेच कामी आलो नाही याची खंत मनात होती.

नंतर 
मी ओबड धोबड होतो पण भरभक्कम होतो . कोनत्याच कारागीराला माझे महत्व पटले नाही.शेकटी काम झाल्यावर माझ काय करायच याच्यावर खलबत झाली . कोनी म्हटल याचे दोन तुकडे करा आणि वापरा ..कोन काय तर कोन काय बोलले ठीकसे आठवत देखील नाही .

पण कोनतरी बोलले याला द्या एका कोपर्यात ठेउन आणि मग मोठ्या चर्चेअंती मला जागा मिळाली आणि मी स्थीर स्थावर झालो .

माझी अशी जागा होती तीकडे धोका होता , सहसा कोन माझ्या जवळ देखील फिरकत नव्हते .

मी आपला आभाळाकडे बघत वेळ घालवत होतो , उजव्या बाजुला भला मोठा गव्हाळा डोंगर तर डाव्या बाजुला तळ्याचा माळ . असेच ह्या दोघांशी गप्पा मारत दिवस जात होते .

असाच एक दिवस अचानक कोनतरी माझ्याकर येउन बसला , दुसरा आला , तिसरा आला आणि रोजच येउ लागले .

सकाळ संध्याकाळ माझ्याजवळ गर्दि व्हायला लागली .

गावच्या सभा माझ्या सानीध्यात होउ लागल्या माझे महत्व वाढु लागले ..माझे बाकीचे सहकारी माझ्याकडे हेव्याने बघु लागले .

समाजातही असेच होते नाही का ? कोणाची किमंत कधी वाढु शकते याचा अंदाजही भल्याभल्यान्ना येत नाही .मी तसाच एक .

जो मझ्यावर बसायचा तोच जनुकाही सभेचा अध्यक्ष असच त्याला वाटायच.

गावात कधी कोनाला एकटेपना जानवला की तो इथेच येतो मला भेटायला .

कोनी बोलायला नसेल तरी सभोवताली नजर मारली की एक जिवंतपणा येतो. वेळ निघुन जाते.

काही वर्ष आधी, साधारण 15-20 वर्षापुर्वी जानेवारी संपला की माझ्या अजुबाजुला दिवस दिवस भर मानसांची गर्दी असायची .

गावात म्हणे पाणलोट आला आहे .

माझ्या बाजुलाच याची सभा झाली. अनेक गावकर्यांबरोबर मला देखील हे थोतांड वाटले .

पण लोकान्नी मनावरच घेतले होते .

दिवस दिवस भर माझ्या आजुबाजुला बसुन नको त्या विषयांचा काथ्याकुट करनारे लोक चक्क हातात टिकाव - फावडे घेउन डोंगरावर दिसायला लागले . आणि बघता बघता 5-10 वर्षात उघडे - बोडके डोंगर हीरवा शालु नेसु लागले .

मी देखील प्रसन्न झालो .

कीतीतरी दिवस या कायापालटाच्या गप्पा मी कान देउन ऐकु लागलो .

आणि मीच तो अभागी ज्याने हे नंदनवन होताना देखील बघीतले आणि आता ह्याच नंदन वनाचा विनाश होताना देखील बघतोय .

ज्यान्नी स्वताच्या हाताने खड्डे खांडुन झाडे लावली ..वाढवली त्याच लोकान्ना ती झाडे तोडताना बघुन खुप वेदना होतात .

पण करनार काय ??

गावात समृध्दी आली ...मग माझ्या सोबतीला तरुनांची संख्या कमी झाली . फार तर सकाळ - संध्याकाळ माझे तरुण मीत्र मला भेटायचे . दिवस भर असायचे माझे वृध्द सहकारी .

त्यांच्या वृध्दत्वाच्या कथा एकमेकान्ना सांगनारे .

माझे कितीतरी मित्र मला सोडुन गेले .

पण मी अजुनही आहे तसाच आहे .

मी कित्येकान्ना तरुण होताना पाहीले तर....

कित्येकान्ना म्हातारे होताना पाहीलय ....

कित्येकान्ना देवाघरी जाताना पाहीलय ....

इथेच बसुन स्वप्न रंगवली आणि ती साकार केली असेही माझे सहकारी आहेत ..

तर फक्त आणि फक्त ऐय्याशी , मौज मज्जा करनारे माझे जिवलग देखील मी पाहीलेत .

खुप शिकले ...आज आपल्या पायावर उभे आहेत अशे माझे मित्र खुप दिवसान्नी गावात आले की मला प्रचंड अभिमान वाटतो .

आणि कोनी कितीही मोठा झाला तरी गावात आल्यावर मला भेटल्याशीवाय जात नाही .

खुप काही आहे बोलायला पण बस्स...! बोलेल परत कधीतरी .

वर्षानुवर्ष एकाच जागेवर ,

अनेक उन्हाळे , पावसाळे ,

दुष्काळ , सुकाळ बघत .

अनेकांचे सुख - दुख: ऐकत ,

स्वताच्या जागेवर ठामपणे ,

निच्छिंत, आहे तसाच....

मी एक दगड ..पारावरचा ....!!!!!!

शब्दांकन - किरण शिवाजीराव बोडके

शनिवार, २१ जानेवारी, २०१७

मी शिक्षक झालो / झाले तर.....! ( शाळेतील छोटी मुलगी बोलतेय )

प्रजासत्ताक दिन ( 26 जानेवारी )च्या भाषणासाठी  प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीसाठी लिहिलेले  भाषण. (ती छोटी मुलगी लिहिते आहे असे समजून वाचा)

मी शिक्षक झाले तर ............!

मी जेव्हा आमच्या शिक्षकांकडे पाहते तेव्हा मला नेहमी वाटते किती मस्त असते ना शिक्षक असण.... !
रोज सकाळी शाळेत यायचं दिवसभर मुला मुलींमध्ये रमायच, त्यांना शिकवायचं, शाळा सुटल्यावर त्या मुलांमध्येच रमत गमत घरी जायच.....किती किती भारी असत ना .......!

गावात, सभोवताली ( आजूबाजूला ) मिळतो तो मान , प्रत्येक ठिकाणी शिक्षकांच्या शब्दाला असलेली किंमत किती मस्त ना........!

शिक्षकांचे राहणे पण किती साधे असते ना, मी तर शाळेमध्ये जेव्हा आमच्या शिक्षकांकडे पाहते तेव्हा मला  नेहमी त्यांच्या एका हातामध्ये छडी दुसर्या हातामध्ये पुस्तक त्यावर डस्टर आणि दोन खडू जसे कि सैनिक कसा एका हातात तलवार आणि दुसर्या हातात ढाल घेऊन उभा असतो अगदी तसाच ........  आणि जसे सैनिकांचे युध्द असते शत्रुंबरोबर तसे शिक्षकांचे युद्ध असते अज्ञानी विद्यार्थ्यांबरोबर असे नेहमी मला भासते.
त्यामुळेच मला वाटत राहते मी शिक्षक झाले तर........!

ज्या ज्या वेळी हा विचार माझ्या मनात येतो त्या त्या वेळी मी कुठेतरी हरवून जाते तेव्हा माझ्यासमोर माझेच चित्र उभे राहते ज्यात मी शिक्षक असते  आणि तेव्हा मी माझ्याबद्दलच विचार करायला लागते.
पण मग प्रश्न असा पडतो कि जर मी शिक्षक झाले तर मग मी कशी असेल ? मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर कशी वागेल ?
खर सांगू का मी जर शिक्षक झाले तर मी माझ्या वर्गातल्या मुला मुलींबरोबर अगोदर मैत्री करेल, त्यांच्या सारखे वागायला , बोलायला, चालायला, खेळायला, बागडायला शिकेल. मी अगोदर त्यांच्यामध्ये एकरूप होईल आणि मग त्यांना शिकवेल.

शिकवत असताना मुलांना समजेल उमजेल याच भाषेत शिकवेल.  मी अगोदर हे जाणून घेईल कि मी जे शिकवत आहे ते मुलांना समजत आहे का ?  नसेल समजत तर मी या गोष्टींचा अभ्यास करेल कि यांना का समजत नाही ? कोनात कमी आहे माझ्या शिकवण्यात कि त्यांच्या शिकण्यात ?      जी कमी असेल ती भरून काढण्याचा प्रयत्न करेल.

मुलांना फक्त अभ्यास एके अभ्यासच देणार नाही तर कधी तरी त्यांना निसर्ग शिकवेल, प्राणी पक्षी यांची माहिती सांगेन, त्यांना कधी तरी कुठेतरी मोकळ्या हवेत घेऊन जाईल, बसेल आणि तिकडेच एक दिवसाचा वर्ग घेईन. त्या मोकळ्या हवेत त्यांना माणूस म्हणून कस जगायचे हे पुस्तकाबाहेरच शिकवीन.

मुलांना घेऊन कधी तरी, कुठे तरी सहलीसाठी जाईल ज्या मध्ये मीही त्या मुलांमधलीच एक होईन. त्यांच्या बरोबर नाचेल ,खेळेल ,गाणी म्हणेल ,नदीत दगडे मारून भातुरे काढीन पण हे सगळ करत असताना त्यांना जगण्याचा आनंद शिकवेन.

असे म्हणतात की शाळेचा वर्ग हि फळाची पेटी असते, त्यात शिकणारी मुल म्हणजे बटाटी आणि त्यांना शिकवणारा शिक्षक म्हणजे आंबा आणि हि शाळा म्हणजे भाजीने भरलेले पोत होत आणि त्या पेटीतला  एक सडका आंबा म्हणजेच शिक्षक  संपूर्ण  पेटीला म्हणजेच शाळेला नासवून टाकतो असे पारंपारिक म्हणणे आहे ते मला बदलायचे आहे. 

आधी पालकांच्या आणि नंतर शिक्षकांच्या अपेक्षांच्या ओझ्याने खचलेल्या मुलांना मी मनमोकळेपनाने (स्वच्छंदी) जगण्याचा आधार देईल.

माझ्या वर्गात परीक्षा असेल पण ती फक्त पुस्तकावर नसेल ती असेल अनुभवावर आणि ज्ञानावर.
त्या परीक्षेत कोण पहिला , कोण दुसरा, कोण शेवट असे नंबर येणार नाहीतच पण कोण पास पण होणार नाही आणि कोण नापास पण नाही.  एक तर यशस्वी होतील नाहीतर अनुभवी होतील.
यशस्वी हसतील प्रत्येक परीक्षेमधून तर तेच अनुभवी होतील आयुष्यात येण्यार्या अनेक संकटरूपी परीक्षेला कसे सामोरे जाण्यासाठी. कारण शाळेच्या परीक्षेत यशस्वी होणारी अनेक विद्यार्थ्यी जीवनाच्या परीक्षेत अपयशी होतात कारण त्यांना शालेय जीवनातील परिपूर्ण शिक्षण कमी पडलेले असते.

मी माझे विद्यार्थी असे परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करीन कि वाटेत फुल दिसेल तर त्यावर त्यांना कविता सुचावी,  एखादे मूल दिसेल तर त्यांनी गोष्ट सांगावी,   उदास चेहर्याचा माणूस भेटला तर त्याला त्यांनी हसवावे,  एखादा साधू चालला असेल तर त्याची टवाळी करावी,   गर्दी भेटली तर तिच्यापुढे चार शब्द  त्यांनी बोलावेत.  कोणी सत्पुरुष वा महापुरुष भेटला तर त्याचा जयजयकार करावा,  एखादी मैफिल असेल तर त्यामध्ये त्यांनी  सामील व्हाव.         आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना प्रचंड जिज्ञासा असावी.  म्हणजे खिडकी उघडी दिसली कि मांजर जसे डोकावतेना तशी डोकावण्याची हौस त्यांच्यामध्ये असावी, असे बनवण्याचा मी प्रयत्न करीन.

शुद्ध लेखन सुधारण्याबरोबरच आचार आणि विचारक्षमता सुधारीन आणि शिक्षित विद्यार्थी घडवन्याबरोबर कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करीन.  माझ्या विद्यार्थ्यांना आपल्या नावानंतर किंवा आडनावानंतर सर लावता येईल असे शिक्षक होण्याइतके शिकवणच परंतु   आपल्या नावापुढे सर लावता येईल असे शास्रज्ञ होण्यासाठीचे शिक्षण देण्याचा देखील मी प्रयत्न करेल.

आयुष्यात नेमके काय करायचे हा प्रश्न नेहमीच मी स्वत:लाच विचारते, पण आयुष्यात नेमके कुठे जायचे आहे हेच कळत नाही, मग लक्षात येते कुठे जायचे आहे हि दिशा दाखवण्याचे काम तर शिक्षकच करत असतात आणि हेच बहुमोलाच काम मला इतरांसाठी करायचे आहे.

एक शिक्षक म्हणून नाही तर मला माझ्या पुस्तकांनी ,चुकांनी, मैत्रीने आणि अनुभवाने जे काही शिकवले ते मी मुलांना शिकवेल. कारण तेव्हा मला माझ्या अनुभवांनी खूप काही शिकवले असेल आणि त्यातून काही ओळींचे प्रश्न तयार झाले असतील ते म्हणजे.....

निर्णय चुकतात आयुष्यातले
आणि आयुष्य चुकत जाते....!
प्रश्न कधी – कधी कळत नाही
आणि उत्तर चुकत जाते......!
सोडवताना वाटत सुटत गेला गुंता
परंतु नवनवीन गाठ बनत जाते.....!
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते
परंतु  चालणार्याचे ध्येय मात्र हरवून जाते....!
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी
अनुभव म्हणजे काय तेव्हाच कळते.....!

आणि याच वरील ओळींमध्ये वाट दाखवणारी शिक्षिका मी आहे आणि मी माझ्या विद्यार्थ्यंचे ध्येय हरवण्यासाठी नाही तर ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

अशा प्रकारे जर मी शिक्षिक झाले तर डिजिटल आणि हायटेकच्या जमान्यात  फक्त विद्यार्थी बनवणारी शिक्षिका न होता माणूस बनवणारी शिक्षिका होईल..........! 

कारण मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदूरुपी शिक्षिका होऊन चातकाची तहान भागवण्यात जास्त श्रेष्ठता आहे असे मला वाटते.

                                                                                          -✍गणेश & उदय....!
mi-shikshak-jhale-tar-student

शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

मी शिक्षक झालो / झाले तर.....! ( शाळेतील छोटी मुलगी बोलतेय )

प्रजासत्ताक दिन ( 26 जानेवारी )च्या भाषणासाठी  प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका बहिणीसाठी लिहिलेले भाषण. (ती छोटी मुलगी लिहिते आहे असे समजून वाचा)