Pages

शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

रोकडेश्वर विद्यालयाचे आई- बाप ( कापूसकर सर व मिंडे सर )

नमस्कार 

गेली दोन तीन दिवस बरेच लेख वाचले...आवर्जून एक ना एक ओळ वाचून काढली.
आज तसा नं. आहे कापूसकर सरांचा.... उशिरा का होईना काहीतरी लिहावेसे वाटले...इतक्या जणांचे लेख वाचून माझ्यातला लेखक देखील जागा झाल्यासारख मला वाटतंय....!


आता कापूसकर सरांविषयी दोन शब्द लिहिताना मी थोडा जरा मिंडे सरांचा आधार घेऊन बोलतो...!

धाक ...... दहशत .....दरारा = मिंडे सर.

माया.... आपुलकी......दया = कापूसकर सर.



कापूसकर र व मिंडे सर 


माझ्या नजरेतून सांगायचे झाले तर मिंडे सर म्हणजे  रोकडेश्वर विद्यालयाचे बाप  तर कापूसकर सर म्हणजे आई अशा मी त्यांना उपमा देईल.

मुलावर जेव्हा योग्य संस्कार होतात तेव्हा त्याला तितकीच आईच्या मायेची आणि बापाच्या कठोरतेची गरज असते. आणि असे असेल तरच मुलांवर व्यवथित संस्कार होतात. आणि इथे बरोबर हेच झाले असावे असे मला वाटते.

कितीहि लहान मुल असेल ते जेव्हा विनाकारण रडत असत तेव्हा बापाची एक नजर मुलाला शांत करते तशी आपल्या भेदक नजरेने संपूर्ण शाळा शांत करण्याची ताकत मिंडे सरांमध्ये होती.
आणि त्या उलट विनाकरण जशी मुल आईशी हट्ट धरून लाडीगोडी लावतात तशी सर्व विद्यार्थी कापूसकर सरांना मार वाचवन्यासाठी लावायचे. आणि ते आई प्रमाणे प्रेम दाखवून त्याला सोडून पन द्यायचे.


आईकडून मुलांना जसे कौटुंबिक संस्कार मिळतात तसे कापूसकर सरांनी मनमोकळे पणाने वागायला शिकवले.
आणि त्याच प्रमाणे जसे सामाजिक संस्कार वडिलांकडून मिळतात तसे मिंडे सरांनी समाजात कसे वागायचे याचे पुरेपूर धडे दिले.
मोडेल पण वाकणार नाही ....
स्वाभिमान....
स्वावलंबी वृत्ती ....
हे त्यातीलच काही.....!


शिकवणीच्या बाबतीत कापूसकर सरांचे वागणेहि एका आईप्रमाणे,
अगदी short फॉर्म सारखे लिखाण असले तरी त्यांना चालायचे ...शिकवणी देखील त्याच पद्धतीची
अ नि ता = आम्ल मध्ये  निळा लिटमस तांबडा होतो
बे ता नी = अम्लारी मध्ये तांबडा लिटमस निळा होतो असे.

किंवा अगदी झिरो गणातील मुल्द्रव्यांसारखे निवांत.


तर दुसरीकडे मिंडे सर म्हणजे बापासारखा कटाक्ष... गाईड वगेरे तर त्यांच्या डोक्याला लागतच नव्हते.  मग काय तर गुप्तधन - प्रेमचंद , जादुगर - चक्रवर्ती राजगोपालाचार्य ( ये देखिय यह कलियुग का अमृत है बडी अजीब दवा है ,इसका नाम जीवनरस है.......) , 
 ते  साए -  डॉ. हिमांशू जोशी  ( तिनको के सहारे तो  हर कोई जि लेता है मगर कभी कभी तिनको के साए मात्र आसरे भवर से निकलकर किनारे पर आ लगते है.... )  ,
पर्यंत मुलांचे सर्व धडे ना धडे आजही पाठ आहेत.  असा तो कटाक्ष होता.

जशी बापापुढे कुठलीही छोटी चूक मान्य नसते तशी साधा काना उकार वेलांटीहि पहिली वा दुसरी चुकली तरी ती त्यांना मान्य नसायची इतकी बारीक नजर.


एक हिटलर तर दुसरे गांधी ....एक तळपता सूर्य तर दुसरे पूर्णिमेचा चंद्र....एक भडकती ज्लाला तर दुसरे हिमालायचा बर्फ.
आणि ते विध्यार्थ्याना गरजेचे देखील होते कारण कोणी आग होत असेल तर कोणी पाणीही झाले पाहिजे.

असो

परंतु आजही कापूसकर सर दिसताच आपुलकीचे निघणारे दोन शब्द...!  आणि मिंडे सर दिसताच आदराने नकळत त्यांच्या पायाकडे जाणारे हात म्हणजे  त्यांच्याप्रती आजही असलेले प्रेम आणि त्यांनी दिलेल्या संस्कारच प्रतिक म्हनाव लागेल.  

खर तर दोघांच्या विषयात अपेक्षेपेक्षाही खूप सारे मार्क मला मिळाले परंतु त्याही पेक्षा जीवनात उपयोगी येतील असे खूप सारे ज्ञान तुमच्याकडून मिळाले आणि त्यातच खूप समाधान वाटतय.

लिहियाला गेल तर एक कथासंग्रह होईल इतके लिहिण्याजोगे आहे परंतु आता थांबतो.

तुम्ही नेहमी प्रेरणादायी होतात आणि असणार यात काही शंका नाही.
प्रणाम सर....!

Thank you sir…!