प्रजासत्ताक दिन ( 26 जानेवारी )च्या भाषणासाठी प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीसाठी लिहिलेले भाषण. (ती छोटी मुलगी लिहिते आहे असे समजून वाचा)
मी शिक्षक झाले तर ............!
मी जेव्हा आमच्या शिक्षकांकडे पाहते तेव्हा मला नेहमी वाटते किती मस्त असते ना शिक्षक असण.... !
रोज सकाळी शाळेत यायचं दिवसभर मुला मुलींमध्ये रमायच, त्यांना शिकवायचं, शाळा सुटल्यावर त्या मुलांमध्येच रमत गमत घरी जायच.....किती किती भारी असत ना .......!
गावात, सभोवताली ( आजूबाजूला ) मिळतो तो मान , प्रत्येक ठिकाणी शिक्षकांच्या शब्दाला असलेली किंमत किती मस्त ना........!
शिक्षकांचे राहणे पण किती साधे असते ना, मी तर शाळेमध्ये जेव्हा आमच्या शिक्षकांकडे पाहते तेव्हा मला नेहमी त्यांच्या एका हातामध्ये छडी दुसर्या हातामध्ये पुस्तक त्यावर डस्टर आणि दोन खडू जसे कि सैनिक कसा एका हातात तलवार आणि दुसर्या हातात ढाल घेऊन उभा असतो अगदी तसाच ........ आणि जसे सैनिकांचे युध्द असते शत्रुंबरोबर तसे शिक्षकांचे युद्ध असते अज्ञानी विद्यार्थ्यांबरोबर असे नेहमी मला भासते.
त्यामुळेच मला वाटत राहते मी शिक्षक झाले तर........!
ज्या ज्या वेळी हा विचार माझ्या मनात येतो त्या त्या वेळी मी कुठेतरी हरवून जाते तेव्हा माझ्यासमोर माझेच चित्र उभे राहते ज्यात मी शिक्षक असते आणि तेव्हा मी माझ्याबद्दलच विचार करायला लागते.
पण मग प्रश्न असा पडतो कि जर मी शिक्षक झाले तर मग मी कशी असेल ? मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर कशी वागेल ?
खर सांगू का मी जर शिक्षक झाले तर मी माझ्या वर्गातल्या मुला मुलींबरोबर अगोदर मैत्री करेल, त्यांच्या सारखे वागायला , बोलायला, चालायला, खेळायला, बागडायला शिकेल. मी अगोदर त्यांच्यामध्ये एकरूप होईल आणि मग त्यांना शिकवेल.
शिकवत असताना मुलांना समजेल उमजेल याच भाषेत शिकवेल. मी अगोदर हे जाणून घेईल कि मी जे शिकवत आहे ते मुलांना समजत आहे का ? नसेल समजत तर मी या गोष्टींचा अभ्यास करेल कि यांना का समजत नाही ? कोनात कमी आहे माझ्या शिकवण्यात कि त्यांच्या शिकण्यात ? जी कमी असेल ती भरून काढण्याचा प्रयत्न करेल.
मुलांना फक्त अभ्यास एके अभ्यासच देणार नाही तर कधी तरी त्यांना निसर्ग शिकवेल, प्राणी पक्षी यांची माहिती सांगेन, त्यांना कधी तरी कुठेतरी मोकळ्या हवेत घेऊन जाईल, बसेल आणि तिकडेच एक दिवसाचा वर्ग घेईन. त्या मोकळ्या हवेत त्यांना माणूस म्हणून कस जगायचे हे पुस्तकाबाहेरच शिकवीन.
मुलांना घेऊन कधी तरी, कुठे तरी सहलीसाठी जाईल ज्या मध्ये मीही त्या मुलांमधलीच एक होईन. त्यांच्या बरोबर नाचेल ,खेळेल ,गाणी म्हणेल ,नदीत दगडे मारून भातुरे काढीन पण हे सगळ करत असताना त्यांना जगण्याचा आनंद शिकवेन.
असे म्हणतात की शाळेचा वर्ग हि फळाची पेटी असते, त्यात शिकणारी मुल म्हणजे बटाटी आणि त्यांना शिकवणारा शिक्षक म्हणजे आंबा आणि हि शाळा म्हणजे भाजीने भरलेले पोत होत आणि त्या पेटीतला एक सडका आंबा म्हणजेच शिक्षक संपूर्ण पेटीला म्हणजेच शाळेला नासवून टाकतो असे पारंपारिक म्हणणे आहे ते मला बदलायचे आहे.
आधी पालकांच्या आणि नंतर शिक्षकांच्या अपेक्षांच्या ओझ्याने खचलेल्या मुलांना मी मनमोकळेपनाने (स्वच्छंदी) जगण्याचा आधार देईल.
माझ्या वर्गात परीक्षा असेल पण ती फक्त पुस्तकावर नसेल ती असेल अनुभवावर आणि ज्ञानावर.
त्या परीक्षेत कोण पहिला , कोण दुसरा, कोण शेवट असे नंबर येणार नाहीतच पण कोण पास पण होणार नाही आणि कोण नापास पण नाही. एक तर यशस्वी होतील नाहीतर अनुभवी होतील.
यशस्वी हसतील प्रत्येक परीक्षेमधून तर तेच अनुभवी होतील आयुष्यात येण्यार्या अनेक संकटरूपी परीक्षेला कसे सामोरे जाण्यासाठी. कारण शाळेच्या परीक्षेत यशस्वी होणारी अनेक विद्यार्थ्यी जीवनाच्या परीक्षेत अपयशी होतात कारण त्यांना शालेय जीवनातील परिपूर्ण शिक्षण कमी पडलेले असते.
मी माझे विद्यार्थी असे परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करीन कि वाटेत फुल दिसेल तर त्यावर त्यांना कविता सुचावी, एखादे मूल दिसेल तर त्यांनी गोष्ट सांगावी, उदास चेहर्याचा माणूस भेटला तर त्याला त्यांनी हसवावे, एखादा साधू चालला असेल तर त्याची टवाळी करावी, गर्दी भेटली तर तिच्यापुढे चार शब्द त्यांनी बोलावेत. कोणी सत्पुरुष वा महापुरुष भेटला तर त्याचा जयजयकार करावा, एखादी मैफिल असेल तर त्यामध्ये त्यांनी सामील व्हाव. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना प्रचंड जिज्ञासा असावी. म्हणजे खिडकी उघडी दिसली कि मांजर जसे डोकावतेना तशी डोकावण्याची हौस त्यांच्यामध्ये असावी, असे बनवण्याचा मी प्रयत्न करीन.
शुद्ध लेखन सुधारण्याबरोबरच आचार आणि विचारक्षमता सुधारीन आणि शिक्षित विद्यार्थी घडवन्याबरोबर कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करीन. माझ्या विद्यार्थ्यांना आपल्या नावानंतर किंवा आडनावानंतर सर लावता येईल असे शिक्षक होण्याइतके शिकवणच परंतु आपल्या नावापुढे सर लावता येईल असे शास्रज्ञ होण्यासाठीचे शिक्षण देण्याचा देखील मी प्रयत्न करेल.
आयुष्यात नेमके काय करायचे हा प्रश्न नेहमीच मी स्वत:लाच विचारते, पण आयुष्यात नेमके कुठे जायचे आहे हेच कळत नाही, मग लक्षात येते कुठे जायचे आहे हि दिशा दाखवण्याचे काम तर शिक्षकच करत असतात आणि हेच बहुमोलाच काम मला इतरांसाठी करायचे आहे.
एक शिक्षक म्हणून नाही तर मला माझ्या पुस्तकांनी ,चुकांनी, मैत्रीने आणि अनुभवाने जे काही शिकवले ते मी मुलांना शिकवेल. कारण तेव्हा मला माझ्या अनुभवांनी खूप काही शिकवले असेल आणि त्यातून काही ओळींचे प्रश्न तयार झाले असतील ते म्हणजे.....
निर्णय चुकतात आयुष्यातले
आणि आयुष्य चुकत जाते....!
प्रश्न कधी – कधी कळत नाही
आणि उत्तर चुकत जाते......!
सोडवताना वाटत सुटत गेला गुंता
परंतु नवनवीन गाठ बनत जाते.....!
दाखवणाऱ्याला वाट माहित नसते
परंतु चालणार्याचे ध्येय मात्र हरवून जाते....!
दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी
अनुभव म्हणजे काय तेव्हाच कळते.....!
आणि याच वरील ओळींमध्ये वाट दाखवणारी शिक्षिका मी आहे आणि मी माझ्या विद्यार्थ्यंचे ध्येय हरवण्यासाठी नाही तर ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
अशा प्रकारे जर मी शिक्षिक झाले तर डिजिटल आणि हायटेकच्या जमान्यात फक्त विद्यार्थी बनवणारी शिक्षिका न होता माणूस बनवणारी शिक्षिका होईल..........!
कारण मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदूरुपी शिक्षिका होऊन चातकाची तहान भागवण्यात जास्त श्रेष्ठता आहे असे मला वाटते.
-✍गणेश & उदय....!
nice
उत्तर द्याहटवाSweet����
हटवाप्रतिसादाबद्दल धन्यवाद
हटवाVery nice n helpful send on more topics
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल धन्यवाद
हटवाVery Nice
उत्तर द्याहटवा