Pages

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

सोशल नेटवर्क

सोशल नेटवर्क...........!
आज प्रत्येक जणच सोशल मिडियाचा भरपूर प्रमाणात वापर करताना दिसत आहे. व्हाटसअप आणि फेसबुक तर अनेकांचे अक्सिजन झाले आहे.  तसे पाहायला गेले तर हि एका प्रकारची काळाची गरज बनली आहे असे म्हणायला हरकत नाही.
परंतु मला सोशल मिडिया वापर्त्याकर्त्यांच्या काही गोष्टी खूप खटकतात.
सर्वात जास्त खटकणारी गोष्ट म्हणजे युझरनेम ....!
व्हाटसअप च्या बाबतीत सांगायचे झाले तर,
प्रत्येक जणांच्या व्हाटसअप मध्ये अनेक ग्रुप असतील आणि त्या मध्ये अनेक अनोळखे व्यक्ती असतात किंवा अनेक माहित असून त्यांचे नंबर सेव्ह नसतात. अशा वेळेस अनेक जणांचे युझरनेम पाहिले तर स्वता:चे नाव सोडून भलतेच काहीतरी असते.
कोणच्या स्माईली तर कोणचे वेगवेगळे टोपण नाव जे कोणालाच माहित नसते जे त्यांनी स्वत:नीच  ठेऊन घेतलेले ( उदा. किंग,परी,परफेक्शनिस्ट.....ई ) अशा वेळी हा नक्की कोण व्यक्ती आहे हे ओळायला खूप त्रास होतो. हि गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते.



आता हीच गोष्ट आहे Instagram या सध्याच्या नव्या पोपुलर सोशल मिडियाच्या बाबतीत.... तिथ तर वापर्त्याकर्ते कहरच करत आहे. कित्येक वेगवेगळ्या प्रकारचे युझरनेम तेथे पाहायला मिळेल(उदा. bond००७, angel, king, jems07, 6_1_9, कोणाचे लकी नंबर ,कोणाचे गाड्यांचे नंबर, कोणाचे जन्मवर्ष…. इ ) आणि  तिथे पोस्ट केलेला प्रत्येक फोटो हा युझरनेमनेच दाखवत असल्या कारणाने सर्वात जास्त कन्फुजन तिथे होते कि नक्की कोनी पोस्ट केली आहे.
प्रत्येक्षात व्यक्तीचे जे रिअल नाव आहे ते प्रोफाईल मध्ये हाईड असते किंवा फेसबुक कडून ते फेच केले जाते.
याठिकाणी तुम्हाला असे  युझरनेम ठेवायचे असेल तर ठेवा माझी काही हरकत नाही परंतु त्याअगोदर तुम्ही तुमचे सर्वांना माहित असलेले नाव लिहा आणि पुढे कंसामध्ये तुम्हाला काय टोपण नाव द्यायचे असेल ते द्या. दुसर्यांना तरी कळेल नक्की आपण कोण आहात.
दुसरा मुद्दा म्हणजे फेसबुक Tag.....
काहीही सबंध नसताना अनेक फोटो आपल्याला Tag होत असतात. उगाच त्याचे अनेक नोटीफिकेषण येत असतात. आता या गोष्टीला कंट्रोल करणे खूपच कठीण आहे त्यासाठी पहिला उपाय आपणच करायचा कि सेटिंगमधून Tag सेटिंग कंट्रोल करायची.
तरीही थोडी जनजागृती महत्वाची आहे कि खरच फोटो Tag करण्याची गरज असेल तरच तो केला पाहिजे हे अशा अप्रत्यक्ष माध्यमातून पोस्टद्वारे सांगणे.
आता आणखी एक नवीन गोष्ट खूप पोपुलर झाली आहे ती म्हणजे  हॅशटॅग  #HashTag....
हॅशटॅग  #HashTag का वापरतात कसे वापरतात हे बर्याच लोकांना माहित नाही असो....  परंतु याचा फायदा असा झाला आहे कि ज्या व्यक्तीला पोस्ट करायची आहे परंतु त्याबद्दल तो काही लिहू शकत नाही किंवा काय लिहावे हेदेखील कळत नाही तो आरामात या # हॅशटॅग चा वापर करून मस्त फोटो आणि पोस्ट शेअर करतो ( उदा. #enjoy #besstti #goa)
यामुळे पोस्ट पाहणारे देखील त्यातला मतीतअर्थ कळून घेतात आणि लाईक आणि कमेंट देतात. परंतु यामुळे जो कोणी एकाद्या पोस्टबद्दल काहीतरी लिहू शकत होता त्याची देखील क्रयशक्ती कमी झाली आहे आणि तो पण या हॅशटॅगचा वापर करत आहे.
असो.... शेवटी सांगायचा उद्देश हाच आहे कि आपण जे काही शेअर करतो ते पूर्णपणे पुढच्या व्यक्तीला सहजगत्या कळेल ( उदा. आपण कोण आहोत, आपण कशाबद्दल पोस्ट केली आहे, आपण त्यामाध्यमातून काय बोलू इच्छिता ई ...)  याची आपण प्रत्येकाने खबरदारी या सोशल नेटवर्क वर घेतली तर खूप बरे होईल असे नाही का वाटत.......!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा