Pages

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

इंजिनीरिंग = इलेक्शन

इंजिनीरिंगचा विदयार्थी असल्यामुळे सहज इंजिनीरिंग आणि इलेक्शनचे साधर्म्य लावण्याचा मी प्रयत्न केला.

गेल्या अनेक दिवसात खूप काही कामे केलेले कार्यक्षम , प्रामाणिक, हुशार, व्हिजणरी असे व्यक्ती (उमेद्वार) जर या शेवटच्या दोन दिवसात कुठल्याही बाबतीत  कमी पडले मग ते प्रचार,गाठीभेटी,सोशल मीडिया,कार्यकर्त्याची फौज, भाड्याचे कार्यकर्ते आणी त्यांची मनबांधनी,पैसे वाटप व याप्रकारचे इतर प्रलोभने....!
यात जर चांगला उमेदवार चुकूनही एक टक्काही कमी पडला तर त्याचा पराजय होऊ शकतो.
कारण या शेवटच्यादिवसात  जो उमेदवार मतदारांना भूलथापा देऊन त्यांना वशीभूत करण्यात यशस्वी होईल त्याचा विजय होण्याची बऱ्याच अंशी शक्यता असते.

कारण मी याचा संदर्भ सहज इंजिनिरिंगशी लावला तर असे जाणवले की,
जो विद्यार्थी प्रामाणिक पणे वर्षभर अभ्यास करतो आणि तीच गती तो शेवटच्या दिवसात ठेवतो तेव्हा तो फक्त योग्य मार्क मिळवतो
परंतू,
जो विद्यार्शी शेवटच्या दिवशी पूर्ण नाईट मारून अभ्यास करतो आणि नुसता अभ्यास न करता इतर गोष्टीही मॅनेज करतो म्हणजे कॉपी असेल, मागच्या पुढच्याची मनधरणी करून त्यांना आमिषे दाखवून त्यांना वशीभूत करून निडर होऊन सर्व पर्यायी मार्गांचा वापर करून जो पेपर लिहून परीक्षा देतो तो प्रामाणिक विद्यार्थ्यापेक्षाही जास्त मार्कस पाडतो हे एक मोठं सत्य आहे आणि तेही अनुभवलेलं.
हा फॅक्ट आहे आणि तोही न बदलता येण्याजोगा....!

त्यामुळे कार्यक्षम उमेदवार आपण या दोन दिवसात जे काही कराल त्यावर तुमचं भवितव्य असेल असे मी समजतो .
बाकी तुम्ही केलेलं आतापर्यंतचे काम हे क्षणभंगुर ठरू शकते......!

असो,
पण शेवटी सुज्ञान मतदारांना विनंती करतो की कुठलाही पक्ष न बघता एक योग्य उमेदवार पाहून आपण मतदान करा
आणि आपण कराल अशी आशा करतो.

#माझ्या_गावाकडील_इलेक्शन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा