Pages

बुधवार, १ मार्च, २०१७

भावनिक क्षण

#भावनिक_क्षण

दुपारी तीन – साडेतीन ची वेळ असेल, मोबाईल व्हाईब्रेट झाला, व्हाटसअप मेसेज आला होता, पर्सनल मेसेज आणि माझे दोन महत्वाचे ग्रुप सोडून सगळे ग्रुप म्युटच असतात  म्हणून नोटीफीकेशन बार खाली करून पाहिला तर मित्राने मेसेज केला होता, लगेच  ओपन करून पहिला तर माझ्या गावातिल अखंड हरीनाम सप्ताहच्या हॅंड्बीलचा फोटो त्याने पाठवला होता.

सामाजिक कार्यक्रम आणि विशेष: गावातील असे अनेक कार्यक्रमांची मला खूप लगाव आहे म्हणून हि माहिती जाणून घ्यायला मी खूप उत्सुक होतो.

फोटो ओपन केला आणि वाचनास सुरुवात केली, प्रस्तावनेच्या पहिल्या चार ओळी वाचल्या आणि अचानक माझ्या हाताचा थरकाप झाला, माझ्यापुढील कॉम्पुटरची स्क्रीन धूसर झाली, डोळ्यात अचानक अश्रू तरळले, मोबाईल अलगद किबोर्ड वर ठेवला गेला, मी दोन मिनिटे स्थब्ध झालो, मनाचे विचारचक्र चालू होऊन मन भूतकाळात गेल आणि माझ मन खूप हळव झाल.  कारण.......



कारण ज्या ओळी वाचल्या त्या अशाप्रकारे होत्या
आज एकविसाव्या शतकात विज्ञानाने डोळे दिपले आहेत .जगात उत्क्रांती घडून आली. जग जवळ आले ,भौतिक ज्ञान विकसित झाले पण मनाला शांती नाही. कारण भौतिक ज्ञानापेक्षा आत्मिक ज्ञान,समाधान महत्वाचे आहे आणि आत्मिक ज्ञान संतांच्या विचारांनी प्राप्त होत असते. त्यासाठी अनादी काळापासून सप्ताहाची रूढी ,प्रथा आहे ,ज्यात विद्वान विचारांचे कीर्तनकार आणून सद्विचार समाजाला दिले जातात. गेली ९९ वर्षे याच हेतूने
 आणि त्यात वै. ह.भ.प. शंकर महाराज बोडके आणि ***वै. ह.भ.प. सबाजी बबन सातकर*** ( माझे आजोबा )  यांच्या आशीर्वादाने तसेच ह.भ.प.दीपक महाराज बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे........................!


यातील  एक ओळ माझ्या मनाला खूप हळवी करणारी होती ती म्हणजे वै. ह.भ.प.सबाजी बबन सातकर यांच्या आशीर्वादाने....  माझ्या आजोबांच्या नावाची .

खर तर हि गोष्ट अभिमान वाटण्यासारखी आहे त्यात हळव होण्याच कारण काय ? अस मांझ एक मन दुसर्या मनाला विचारात होत.

शेवटी मला अभिमान होता, आहे आणि असणारच कारण हे नाव आणि त्यांच्या सहभाग नेहमीच होता परंतु ते पुन्हा एकदा नव्याने पाहायला ,अनुभवायला आज ते इथे नाहीत याचे सर्वात मोठ दुख आहे. विधात्याला का इतक्या लवकर त्यांची आठवण आली असावी हा प्रश्न मी माझ्याच मनाला विचारात होतो पण उत्तर माझ मन कस देणार? ते त्या विधात्यालाच माहित. शेवटी माझ्याच मनाची समजूत काढण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा पर्याय देखील नाही आहे.

खर सांगायचं तर सप्ताहाचे सात दिवस म्हणजे आमच्या परिवारासाठी उत्सवच असायचा. यात्रा, दिवाळी ला जसे घरात आनंदाचे वातावरण असायचे तसे त्या या सप्ताहात असायचे. अनेक लोकांची दररोज ये-जा असायची. जेव्हढे कोणी बाहेरचे बुवा मंडळी,भाविक यायचे त्यांना आवर्जून बाबा घरी घेऊन यायचे. या उन्हाळयाच्या काळात सगळी मंडळी दुपारी निवांत आमच्या आंब्याखाली थंड हवा घेत गप्पा मारत असायची.

 कधी कधी इतके पाहुणे यायचे कि आमची आजी त्यांना चहा आणि सरबत करून कंटाळून जायची ....आजोबांना बोलायची देखील काय दररोज दररोज नवनवीन घेऊन चालता गावात काय घर नाही का कोणाचे  ? परंतु त्यातदेखील आपुलकी होती.
परंतु बाबांचे सर्वांवरती प्रेम होत त्यामुळ ते अनेकांना आणायचे. त्यावेळी मनभरून आमचे कौतुक करायचे. स्पेशली माझे तर विचारूच नका. भिंतीला टांगलेली माझे मेडल दाखवून सगळ्यांना सांगायचे , प्यॉर लय हुशार आहे, इंजिनेर आहे , पण अध्यात्माची पण लय गोडी आहे. हरिपाठ , थोडेफार अभंग चांगल येतंय त्याला पण.

परंतु खर सांगायचे तर आजोबा अभिमानाने या गोष्टी सांगायचे त्यांना वाटायचे देखील कि हा हे सगळ करेल तस  मी हे थोड्याफार प्रमाणात केलं पण इतके करू शकलो नाही याच वाईट वाटत.
परंतु अशी मजा आता घरी नसणार यामूळ मी हळवा तर  झालो आहे. तरही  हे तर दुय्यम कारण झाल,


खर हळव होण्याच कारण हे आहे कि आपल्या नातवाला आध्यात्माची चांगली शिकवण देऊन देखील मी ते चांगल्या प्रकारे घेऊ शकलो नाही. याही पुढे जाऊन मला या गोष्टीचे वाईट वाटत आहे कि संपूर्ण समाजाला वारकरी साम्प्रदयाची आणि  अध्यात्माची शिकवण देणारे स्वतःच्या नातवाला ते पूर्ण देऊ शकले नाही मुळात मी ती घेऊ शकलो नाही आणि वरती आज सत्य परिस्थितीत मी इकडे कुठलाही सन,वार, तिथी काहीही न जुमानता खुशाल मांसाहार करतो आहे, वाईट मला या गोष्टीचे वाटत आहे .माझ मनच मला आता खात आहे. मनातून मलाच गिल्टी फील होत आहे. मनात आत्मचिंतन करण्यापलीकडे काही उपाय पण नाही आहे.
मनात अध्यात्माची गोडी तर आहेच परंतु आचरणात ती आणता येत नाही हि मोठी शोकांतिका आहे.


परंतु एक गोष्ठ आहे कि मी देखील जाणतो कि मी चांगला नसेलही परंतु जे काही थोडेफार चांगले व्यक्तिमत्वाचे गुण निर्माण झाले आहे त्यात अध्यात्माचे महत्व खूप देखील तितकेच आहे.
कारण आजोबा ,त्यांचे कर्तुत्व आणि अध्यात्म यांचे माझ्या जीवनात खूप मोठे स्थान राहिले आहे आणि पुढेही राहील हे मी ठामपणे सांगू शकतो.


शेवटी आज तेही म्हणत असतील ज्या दिव्याने सर्वांना प्रकाश दिला त्या दिव्याखाली मात्र अंधारच राहिला. आणि सत्यात हे खरच म्हणाव लागेल कारण तसेही दिव्याखाली नेहमी अंधारच असतो.

परंतु हळव्या मनाने मी नक्की सांगेन कि अनेक ठिकाणी म्हणतात किंवा बोलले जाते कि  तुम्ही किती जगला यापेक्षा कसे जगाला याला महत्व असते.
आणि
मरावे परी कीर्तीरूपी उरावे या दोन्ही ओळी आज मी प्रत्यक्षात आजोबांच्या बाबतीत मी अनुभवत आहे हि खूप मन भरून येणारी गोष्ट आहे आणि याच त्यांच्या आठवणी नेहमीच मला सकारात्माकडे घेऊन जाऊन  मला प्रेरणादायी असतील यात काही शंकाच नाही.....!

असो.....
परंतु माझ्यासारखी पिढी जरी आज पुरोगामी जीवन जगत असली तरी तिला सुख आणि आनंद या शब्दांचा खरा अनुभव जर घ्यायचा असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही असे मी तरी आज मानतो.
At last as per my view if science and technology is a vehicle then spirituality (अध्यात्म ) and god is travel it.

|| राम कृष्ण हरी  ||


✍🏻गणेश सातकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा