साहित्य, कला, क्रीडा, राजकारण,आठवणी आणि पर्यटन....बस एव्हढंच....! नाही आणखीनहि काही....!
शनिवार, ३० डिसेंबर, २०१७
रोकडेश्वर विद्यालयाचे आई- बाप ( कापूसकर सर व मिंडे सर )
शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
स्वप्रयात्नातून डिजिटल क्रांती
रविवार, ३० जुलै, २०१७
एक क्षण....निवांत...उनाड..!
![]() |
ओंकारेश्वर ब्रिज,पुणे |
मनावर त्या गर्द ढगांची सावली पडते,
मधेच त्यात हळूच गालावर स्मित हास्य उमटवनारी वाऱ्याची मंद झुळूक येते....कदाचित आपल्या जवळ अगदी काढावर जसे अगदी आपल्या अंगावर...!
अचानक ओल्या अश्रुंवर पडतात कधीतरी नभांमधून वाट काढून आलेली ती सुंदर किरणे....
आणि त्यातून आपल्या त्वचेवर येणार अलगद शहारा...
शुक्रवार, २३ जून, २०१७
गावरान शब्द
मी घाटी !!
आमच्या घाटावर जी बोलीभाषा आहे तीने मराठी भाषेला अनेक शब्द बहाल केले आहेत .
गावाकडे नियमीत वापरातले काही शब्द, तसेच आता फक्त वयोवृद्ध लोकं जे शब्द वापरतात असे काही शब्द आम्ही संग्रहीत करन्याचा प्रयत्न केला आणि त्या शब्दांच्या अर्थांसह हे आपल्या समोर मांडताना आनंद होईल.
ही माहीती संकलीत करताना " आपन म्हसवंडीकर " या आमच्या गावच्या व्हाट्स समुहाची फार मदत झाली .
माझा घाटावरचा सोडुन मोठा मित्र परीवार आहे .
त्यांच्यासाठी तर अभ्यास करावी अशी माहीती आहे ही .
आणि काही मंडळी अशीही असतील ज्यान्नी कधीतरी हे शब्द ऐकलेले आहेत , बोललेले आहेत पण हल्ली ते असे शब्द वापरत नाही , त्यांना हा संग्रह बघून विशेष आनंद होईल .
अस्सल घाटी / पठारी शब्द
१) मोक्कार - मुबलक , भरपूर
२) मायंदाळ - प्रचंड
३) केंदुळ - बराच वेळापासुन
४) कवाचं - कधीच , केंव्हाच
५) रेटुन - जोर देउन
६) आवाळ - घट्ट
७) येळमाळं - दिवभर
८)कोड्यास - भाजी
९) त्यांठ - तीकडे
१०) लवान - खोलगट भाग
११) चिवाळ - अरुंद भाग
१२) पुचकान - बिनकामाचे
१३) चऱ्हाट - रस्शी , दोरी
१४) गुळचाट - गोड
१५) सवसान - सायंकाळ
१६) चावनाट - जिभेचे चोचले असलेला
१७) बादड - दव
१७) जिब्ड - जीप , कार
१८ ) पुराड -
१९) द्वाड - वाईट
२०) थेंबाट - पाउस
२१) पहाळी / पाळ्ही - पावसाची सर
२२) वंगाळ - कुरुप
२३) बुरुंगाट - रीमझीम पाउस
२४) गदाळ - खराब
२५) वावार - शेत
२६)उली उली - जरा जरा
२७)ह्यांद्र - वेडा
२८) हेंबुड - वेडा
२९)इप्पारं - वेडपट
३०) म्होरं - पुढे
३१)जितराब - जनावरे
३२) बर्गडी - एक हाड
३३) कराळ - उतरता
३४) उत्याळ - उथळ
३५) सवसांच - संध्याकाळी
३६) पेताड - मद्यपी
३७) हेपास्ल - मस्तीखोर
३८) लपाटन -
३९) बर्हाणी - उडनटप्पु
४०) लुगड - साडी
४१) वटकावणं - तेकु
४२) सटमाळं
४३) रेमटावल , बदकावल - मारणे
४३) दोबाड - म्हैस
४४) खापुर्ड , शेपुर्ड - शेळी
४५) गावड - गाय
४६)यंगराट - वात्रट
४७) लुगारं - कमकुवत
४८) बंडी - शर्ट
४९) गुणोरोक -
५०) वट्टा - ओटा
५१) फोकाटी , शेमटी - बांबु
५२) झाड्याला - शौचाला
५३) निबार - वयस्कर व्यक्ती
५३) कव्हर - कीती वेळ
५४) वाताड - कड्क झालेलं
५५) दाभाड - तोंड
५६) फिंदार्ड , फिंद्री - मुलगी
५७) चघाळ - जनावरांच उरलेल अन्न
५८) भगुलं - पातेलं
५९) पीतळी - जेवनाचे ताट
६०) बैतवार - व्यवस्थीत
६१) येरवाळी - वेळेत
६२) औंदा - यावर्षी
६३) भलतुषा - खोडकर
६४) किडुक - साप
६५ ) मुंडीच्या काट्यावर - डोक्यावर पडणे
६६) वाखं , चिचकुळ - धारदार
६७) वाडगं - गोठा
संकलन - किरण बोडके
शुक्रवार, १६ जून, २०१७
Master's _सेमिनार
#Master's _सेमिनार.
मेघ मुलांची शाळा भरली शिक्षक त्यांचा वारा,
चला मुलांनो सेमिनारची सहल काढूया दिवस आहे बरा।।
वाऱ्यांसारखे PG- coordinator आमचे मेघांसारखे गाईड,
नभासारख्या रेपोर्टवर साईन नसतानाही घेई आमची साईड।।
वादाळासारखा External फाडफाड विचारू लागला Questioन,
वाऱ्याच्या मंदझुळुकी सारखे त्यांचे शब्द ऐकत होते आमचे कान काहीपण।।
गप्प बसून ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता आम्हा,
कारण माहित होते यासाठी शक्यतो यावे लागणार नाही पुन्हा।।
काहीच व्यवस्थित रिसर्च नसूनही सेमिनार देऊन येत आहेत सर्व,
जसे सुरु होणार आहे त्यांच्याच आनंदाचे नवे पर्व।।
शेवटी सर्वात महत्वाचे समाधान व आनंद आहे सर्वांच्या चेहऱ्यावर,
आता नाचत गात निघणार आहोत आम्ही आपापल्या वाटेवर।।
✍🏻गणेश सातकर
बुधवार, १० मे, २०१७
आठवणीतला एक दिवस ...आपला वाढदिवस
' आठवणीतला एक दिवस ...आपला वाढदिवस '
वर्षभरतला एकच असा दिवस असतो.
जिथे हृदयात घर केलेले , मनाने खूपच जवळ असलेले , पण जवळ असूनही अंतर राखून असलेले ,
वर्षभरात कधीही न भेटणारे , न बोलणारे , आपल्यावर नजर राखून चुपचाप राहणारे ,
मनात आठवण काढूनही संवाद न साधणारे , ओळखीचे , अनोळखीचे...नेहमीच सहवासात असणारे , सतत बोलणारे , दूर असूनही संवाद साधणारे ,मनाला ओढ लावणारे , प्रेमाने राहणारे...
आपली आवर्जून आठवण काढतात . आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी.....शुभाशिर्वादांसाठी ...
एखाद SMS करून , किंव्हा फोनवर संवाद साधून किंव्हा प्रत्यक्ष भेटून ...बोलून..
तो शुभदिन म्हणजे आपला वाढदिवस . खरंच अश्यावेळी मन भरून येतं. ...भरल्या आभाळागत ...!
किती हे प्रेम !
सरत्या पावसाच्या सरींसारखं तन-मन अगदी भिजून जातं ह्या प्रेमाच्या वर्षावात .
नव्या आश्या , नव चेतना पल्लवित करतं. खरंच धन्यता वाटते मनाला ....एक दिलासा मिळतो एकप्रकारे .
तरीही त्यातल्या त्यात कुणी जिवाभावाचं राहीलच एखादं...तर मन खट्टू होतं. हे काही वेगळा सांगायला नको.
वाढदिवसाच्या आधीच पासूनच काहीएक दिवस एक चित्र डोळ्यसमोर उभं राहतं.
किंव्हा आपण ते रंगवलेले असत . अमुक अमुक अस असं होऊ शकतं .
किंव्हा व्हायला हवं. अन त्यानुसार आपण आनंदाच्या विविधरंगीत छटा आपल्या अंगा खांद्यावर खेळवत , इकडून तिकडे सैरवैर बागडत असतो.
वाढदिवसाच्या वेळी अश्या ह्या प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मन आनंदाच्या लहरी सुगंधामधे स्व:तहा हरवून जातं . कारण वर म्हटल्या प्रमाणे ........
कधीही न बोलणारे , न भेटणारे , आपलेच जीवाभावाचे, आपली वर्षभरातुन एकदा का होईना आपली आवर्जून आठवण काढतात . हीच बाबा मनाला स्पर्शून जाते .
आयुष्यात दुसरं तिसरं अजून काय हवं असंत. प्रेमाचा एक चतकोर हि आनंद फुलवण्यास पुरेसा असतो.
असा हा आनंदाचा दिवस .... प्रत्येकाच्या जीवनात वर्षभरातून एकदाच येतो ...आठवणीचा अन शुभेच्छांचा वर्षाव करत ... माझा तर येऊन गेला 22 मार्च...आपलाही येईल अशीच आशा,अपेक्षा आणि समाधान घेऊन.
आपल्या आई वडलांची हि एक मोठी देणगीच आहे. त्यांचेच सर्वप्रथम मनोमन तरी चरण स्पर्श करायला हवे.
असंच लिहिता लिहिता.....!
✍🏻गणेश ....
गुरुवार, ३० मार्च, २०१७
आपुलकी मायेची
#आपुलकी_मायेची
एखाद्यादिवशी खिशाला पेन नसला म्हणजे दिवसभर काहीतरी हरवल्यासारखं होतं,
माणसाचंही भलतच आहे हा, नाही म्हणजे आयुष्यात कोण कधी कशी जागा व्यापुन घेईल सांगताच येत नाही, मग ती सजिव असो वा निर्जिव. यात अट फक्तं एकच माणसाचं हृदय सजिव असलं पायजे, जिवंत. मग समोरच्या गोष्टीचं अस्तित्व तो मान्य करतोच करतो!!....
लहानपणी एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी घरात तांडव करूनही प्लॅन सक्सेस होत नाही अस दिसताच (म्हणजेच एखादी गोष्ट पाहिजेच आहे आणि ती सर्व काही करून मिळत नाही असे दिसताच ) मी माझ जवळचं हक्काचं आधारकार्ड बाहेर काढायचो, ते म्हणजे काही झालतरी रात्री जेवायचं नाही.....
रात्र झाल्यावर भुकेमुळे कधी ह्या कडेवर तर कधी त्या कडेवर लोळलाळ सुरू व्हायची..पोटात पडणार्या भुकेच्या आगीने न राहवून अर्ध्यारात्री सर्व झोपलेत अशी खात्री करून मी उठून बत्तीच्या(चिमणी) प्रकाशात भाकरीचे टोपले चाचपाडायचो. तोच, टोपल्यात व्यवस्थित वरून फडक्याने झाकून एक ताट वाढून ठेवलेलं दिसायचं. मी घास दोन घास खात नाही तोच कुणाचेतरी हात डोक्यावरून मायेनं फिरायचे, .. नजर वर करून बघायचो तर आई किंवा आजी बाजुला बसलेली दिसायची.
पोटचं मुल ज्या दिवशी रागारागाने जेवलं नाही खरं सांगतो त्यादिवशी त्याच्याबरोबर घरातल्या माय माऊलीच म्हणजेच आपल्या आईचे पोटही खपाट आहे म्हणुन समजायचं. आता थोडी समज आल्यानंतर मी हे बोलतोय, अनुभवतोय आणि समजतोय सुद्धा.
माझी आई पण माझ्या बरोबर जेवायची, माझ्याबरोबर ताटात जेवायला लागली की ती वस्तु मिळाली नाही त्या दुःखाने म्हणा की आईच्या मायेने म्हणा डोळ्यातले एक दोन अश्रु ताटात पडायचे, त्याने जेवण्याची चव कधी बदलली नाही उलट अधीकची चव यायची. डोळे डबडबून ताटातली भाकर बत्तीच्या मंद प्रकाशात धुसर होऊन पण डोळ्यातच मोत्यासारखी चमकायची.
परंतु आज खंत एकच आहे कि आज बरेच वर्ष मी बाहेर आहे. तरीही मला खात्री आहे आजही मी कधी असा झोपलो तर आई तशीच उपाशी राहील माझ्यासाठी ह्यात दुमत नाही....!
थोडा भावनाविवश झालो आहे. होतो कधी-कधी असा मी....
असो....!
माईची माया अफाट असते ती माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक आईची आपल्या मुलासाठी. बसमध्ये बसलोय, समोरच्या सिटवर एक आई आपल्या लहानशा गोडूल्या बाळाला खिडकीतून बाहेरचा नजारा दाखवत पॉपकॉर्ण खाऊ घालतेय, हे दृश्य बघून अचानक आईची आठवण झाली. अवघडच आहे माणसाच् कधी काय आठवेल सांगताच येत नाही....!
शेवटी एकच,
राग नको....लोभ हवा.....!
✍🏻 गणेश सातकर
बुधवार, २९ मार्च, २०१७
आजाराची कणकण आणि घरचे प्रेम
#आजाराची_कणकण_आणि_घरचे_प्रेम
मागचे तीन चार दिवस जरा नाशिकला गेलो होतो.(24, 25,26 मार्च) दोन दिवस सीपीजिकॉन कॉन्फेरंस होती, ते थोड काम आणि त्याच अनुषंगाने रविवारी तिसर्या दिवशी जरा नाशिक दर्शन घेतले. यायला सोमवारची पहाट उजडली जवळजवळ पाच वाजले. त्यामुळे त्या तीन चार दिवसात खूप धकधक झाली. परत सोमवारी झोप न होताच परत प्रोजेक्टचे काम त्यामुळे संध्याकाळी खूप कणकण जाणवायला लागली. अर्थात थोडीशी झोपेची आणि आरामाची गरज होती म्हणा.
दुसर्या दिवशी गुडीपाडवा होता, म्हणून घरच्यांनी फोन केला नेहमीची विचारपूस केली परंतु माझा थोडासा बदललेला आवाज ऐकून त्यांनी लगेच ओळखले कि जरा आजारी पडलो आहे म्हणून. त्यावरूनच थोड....
आजही आजारी पडलो म्हणजे आई वडिलांची आणि आजीची आठवण येते..त्यांच्या नुसत्या जवळ असण्याने का कुणास ठाऊक भक्कम आधार होतो.. ते गावी असतात, परंतु नुसता आवाजात झालेल्या बदलावरून आई फोनवर म्हणते, ' दवाखान्यात जाऊन ये बाळा ' (नेटवर्क प्रोब्लेममुळे फोन नेहमी लाउडस्पीकर वरच असतो) आणि तिथेच जवळ असलेले वडील म्हणतात त्याला म्हणावं डॉक्टर कडे जा, चांगल तपासून घे, पैशाक नको पाहत बसू जाऊदे गेले तर. त्याच वेळी आझ्या आजीला कळल्यावर आजी लगेच म्हणते त्याला म्हनाव अंगावर दुखन काढू नको, सवय आहे त्याला ,तसा आजारी पडत नाही पण मग एकदा आजारी पडला म्हणजे तो लवकर उठत नाही..आणि जरा पोटभर खात जा म्हणाव...
आजारी असलो म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा त्यांच्याकडून फोनवर विचारपूस होतेच, मग भलेही नॉर्मल काहीहि झाले असेल तरी. त्यामुळे मी कधी आजारी असलो तरी घरी सांगत नाही उगाच नको काळजी यामुळे. परंतु त्यांना असे समजल्यावर ते मात्र काळजीत असतात.
सहज मनात एक प्रश्न डोकावतो, आईवडील आजारी असले म्हणजे आपण इकडे काळजी करू नये म्हणुन कधीच आपल्याला सांगतही नाहीत. कधी फोनवर तस जाणवू देत नाहीत. सहज कुठल्यातरी मित्राकडून कळतं की अरे आज "मामी आणि दादा " दवाखान्यात दिसले होते, तब्येत बरी नाही काय? ..
या त्यांच्या प्रश्नावर आपणच गोंधळून जातो. कॉल केल्यावर सांगतात, विशेष काहीच नाही अंग जरा कणकण करत होतं म्हणून डाॅक्टरांना दाखवून घ्यावं म्हंटल, इतकच्.
अन आपण बसतो टिचभर दुःख त्यांच्याजवळ इवळत.......!
माझ्या मते माझ्यासारख्या अनेकांच्या बाबतीत हीच अवस्था असेल. कदाचित एक संभ्रमअवस्थाच म्हणा ना.
शेवटी ती आपल्या घरच्यांची आपल्याप्रती एक आपुलकी असते आणि निर्मळ , सोज्वळ प्रेम असते कुठेही न मिळनेजोगे.......!
✍🏻 गणेश सातकर
बुधवार, ८ मार्च, २०१७
माझे दहावीचे अविस्मरणीय क्षण.......!
खरतर फक्त परीक्षेचा काळ आणि त्याची आठवण इतकच लिहायचं हाच विचार होता परंतु त्या दहावीच्या आठवणीच इतक्या आहेत कि थोडासा आढावा घ्यावा वाटला आणि त्यानंतर परीक्षेचा काळ वर्णन करावा वाटतो आहे.............!
आणि याच बरोबर दुसर देखील त्याला कारण ते म्हणजे थोडा वेळ जरी एखादा शिक्षक वर्गात आला नाही तर लगेच दुसरे शिक्षक सहजगत्या येऊन शिकवण चालू करायचे म्हणजे मुलांना थोडाही मोकळा वेळ न देणे.
७ वाजता घरून निघणे ५ ते सहा किलोमीटर सायकलवरून प्रवास मग ८ वाजता इंग्रजीचा पहिला एक्ष्ट्रा तास त्यानंतर ९.३० ला गणिताचा तास आणि मग शाळा भरायची ते ५ वाजेपर्यंत. कधी – कधी नंतरही इंग्रजीचे तास व्हयाचे म्हणजे घरी जायला ६ वाजायचे.
इंग्रजी सगळी डोक्यावरून जायची. Change the voice ,add question tag, direct – indirect हे असे सगळे व्याकरण पोरांची झोप उडवायची, तरी काही कधी शेवटपर्यंत कळल नाही . तरी ते खूप भारी लहान होऊन हसी मजाक करून शिकवायचे. म्हणून कुठे तरी पास व्हायला मदत झाली.
शिकवन्या अगोदर धडा आम्हाला वाचायला सांगणे असो..सगळ अविस्मरणीय. फक्त धड्याचे नाव बदलून तोच तोच वर्गपाठ दाखवणे असो किंवा त्यांच्या शिकवणी डेस्क अगदी आमच्या बेंचच्या समोर घेऊन त्याखाली वाकून जोक्स करणे असो सगळ आज आठवतंय.
सगळ्यात भारी त्यांची गोष्ठ होती तीम्हणजे घरी राहिले कि application द्यायचे. मग आम्ही त्याचा खूप फायदा उठवायचो. घरी राहायचे असेल तर दुसर्याकडे आजारी असल्याचे अप्लिकेशन द्यायचे. सर पण खूप हळवे होते. थोड त्यांच्यासमोर रडल कि लगेच सोडून द्यायचे.
आणि आमच्या तपासणीसांचे चेक करायला एक मुलगी ठेवली होती. आता आम्ही कधी ते गणिते लिहीतच नव्हतो किंवा तसा अभ्यास करतच नव्हतो. त्यामुळे दाखवण्याचा त्या मुलीला प्रयत्न कधी आम्ही केलाच नाही तिला ही वाटत असेल हे पण तपासनिस आहे त्यामुळे यांनी लिहले असेल यामुळे गणिताचा अभ्यास काय कधी जास्त झालाच नाही आणि त्याचा फटका परीक्षेत नक्की बसला.
तसा मी या सरांचा लाडका विद्यार्थी होतो. हिंदी आणि इतिहास शिकवायचे. अतिशय कडक शिस्त. सगळ्या शाळेत त्यांचा दरारा होता. एका नजरेत सर्व शाळा स्तब्ध करण्याची त्यांची ताकद होती. त्यांच्या तासाला एकदम सरळ बसायचे , नाकावर माशी जरी बसली तरी हालचाल नाही जांभळी तर मुळीच नाही. नुसतीच कडक शिस्त नव्हती तर शिकवण्याच्या बाबतीतहि तितकेच चांगले.
मुलांच्या कविता तर अर्थासकट पाठच असायच्या परंतु सगळे धढे सुद्धा तोंडपाठ असायचे आजही माझे हिंदीचे अनेक पराग्राफ तोंडपाठ आहेत. हि त्यांचीच किमया आहे.
परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट हि होती कि कितीही मारले तरी घरी सांगता येत नव्हत आणि तसे केलं तर आणखीच मार पडायचा.
परंतु आता जरा परिस्थिती वेगळी झाली आहे असे माझे म्हणजे आहे. पालक नाजूक झाले आहे आणि तशी खंत देखील शिक्षकांनी व्यक्त करून दाखवली आहे.
कधी टाय फक्त प्रार्थनेपुरता फक्त बटनात अडकवून द्यायचो तर कधी बूट घातले नाही तर पायाला बँडेज बांधून मार वाचवायचो व्हा दहावीच्या गंमती. परंतु मिंडे सर जर चेक करायला असले कि सगळ बाजूला ठेऊन गप गुमान मार खाऊन घ्यायचा. कारण त्यांचे काय सांगता येत नव्हते कधी बँडेज पट्टी काढायला लावतील आणि काय करतील.
तेव्हा तरीही मला ६५ टक्के मार्क्स होते ते ८० पैकीच म्हणा पण पूर्णपणे गोंधळाची अवस्था झाली होती कारण काहीच कळत नव्हते ते मार्क्स न दिल्यामुळे.
चौथा पाचवा नंबर आला असेल सहामाई परीक्षेत पण या घोळामुळ कोणाच्या निदर्शनास नाही आलो.
वेगळीच दुनिया होती ती.
सराव परीक्षा असायची. तोंडी परीक्षेचे मार्क्ससाठी डबल चाचणी परीक्षा व्हायची. विज्ञानाच्या प्रक्टिकल परीक्षेला आदल्या दिवशी सगळी सेटलमेंट होऊन कुणाचा मोठा प्रयोग कोणता आणि कोणाचा छोटा प्रयोग कोणता सगळ काही फिक्स असायचे. प्रयोगशाळेत दुर्बिणीखाली काही दिसत नसले तरी सर मला बोलवून म्हणायचे बघ काहीतरी हालचाल करत आहेत ते क्षुक्ष्मजिव आहेत मीही हा म्हणायचो खर तर मला काहीच त्याखाली दिसत नसायचे.
परीक्षेच्या अगोदर प्रत्येक विषयाला बोलवायचे ते गेस्ट लेक्स्चर देणारे शिक्षक. त्यांचे मार्गदर्शन, बोर्डला पेपर कसा असतो, कसा लिहायचा, कुठ प्रश्न क्रमांक टाकायचा तर कुठ रेषा मारायच्या इतपर्यंत सांगितलं जायचे.
आमच्या सेंडअप च्या दिवशी अनेक वर्षातून ठेवलेली आमची गॅदरिंग आणि त्यावेळी आम्ही केलेली मजा आजही आठवते.
आमची सामायिक विहीर आहे. त्या दिवशी आमची शेताला (कांद्याला ) पाणी भरायची बारी (वेळ ) होती. रात्री दोन वाजता लाईट येणार होती. त्यावेळी मोटार चालू करणे गरजेचे होते. आता वडील घरी नसल्यामुळे आईलाच हे सर्व कराव लागणार होत. तेव्हा आईला सोबती म्हणून मी रात्री दोन वाजता मोटार चालू करून पहाटे पाच वाजेपर्यंत आईला पाणी भरू लागलो म्हनण्यापेक्षा वाफा भरला कि सांगायचे कि बारे द्या अस माझ काम होत.आणि त्याही पेक्षा सोबतीला होतो हे महत्वाच. तेव्हा बत्तीच्या वर आडवा डब्बा लावून बनवलेली एक बॅटरी माझ्याकडे आणि चार्जिंग ची बॅटरी आईकडे होती हे आजची मला आठवतय.
भरपूर सारे मुल बघून मी अधिकच डिप्रेशन मध्ये गेलो होतो. वेगळाच नजरा होता. गेटवर एकदा चेकिंग वर्गात गेल्यावर एकदा चेकिंग म्हणजे कॉपी करण खूपच अवघड आणि तसेही कॉपीचा आणि आपला कधी दूरदूर पर्यत सबंध नव्हता खूप घाबरायचो त्यामुळ खूप भयावह असे वातावरण म्हटले तरी हरकत नाही.
आभाळ पेलणारे सारे पक्षी उडून गेले
दुर्भाग्य या फुलाचे माळी असा मिळाला
वेळी तोडण्यास तो आज सिद्ध झाला’.
शेवटच्या पेपरच्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा चालवलेली मोटारसायकल हि अविस्मरणीय आहे.
मी वडिलांचा फोन बरोबर आणला होता. आत्याच्या मुलाला निकाल बघायला सांगितला होता. ११ वाजता निकाल लागला, निकाल पाहायला भरपूर गर्दी तिथे होती ,माझे अनेक मित्रही होते. परंतु सर्वर डाऊन झाला होता त्यामुळे अधिकच वेळ लागत होता.
मी बोललो नक्की नाहि सांगता यायचे किती ते ...!
मनातून खूप घाबरलो होतो. छाती धड धड करायला लागली होती.
उत्सुकता शिगेला पोहचली होती.
त्याने विचारले तरी किती?
मी थरथरच उत्तरलो ऐंशीच्या आसपास पडायला पाहिजे....!
पंच्याऐशी (८५) टक्के मार्क्स मिळाले आहेत.
मी त्याला परत नाव व्यवस्थित चेक करायला सांगितले. तरी तो होच बोलला.
काही वेळ थांबलो आणि शेवटी प्रिंट काढून पाहिले. खरच ८५.६९ टक्के मार्क्स मिळाले होते.
मला विश्वास बसत नव्हता सगळा निकाल व्यवस्थित दोन वेळा चेक केला आणि मी थोडा स्थिरावलो मला विश्वास बसला. माझा आनंद गगनात मावत नव्हता. लगेच देवाला हात जोडले देवाचे आभार मानले कारण खूप मार्क्स पडले होते. अपेक्षेपेक्षाहि जास्त. मी खूप खुश होतो ,इतरांना किती आहे किंवा किती नाही याचा विचारही नव्हता.
माझ मन सैर भैर धावत होत. मी माझ्यामधेच खूप खुश होतो.
माझ्यासोबत जे नव्हते त्यांना जास्त असतील हे मी समजून गेलो.
आतापर्यंत सहावा सातवा येणारा मी डायरेक्ट पहिला कसा हा प्रश्न मलाही पडला होता. जरा वेगळ वाटत होत. आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु हे सगळ खर होत.
प्रत्येक जन मला मनातून शिव्या घालत होता हे मी आजही जाणतो. अनेक जन अक्षर: नंबर गेला म्हणून रडले देखील ..... स्वाभाविक आहे त्यांचे रडणे देखील. परंतु माझा आनंद मात्र वेगळाच होता. कधीही न व्यक्त करण्याजोगा.
संध्याकाळी वडील माझा निकाल आणण्यासाठी शाळेत आले त्यावेळी एका शिक्षकांनी नकळत एक वाक्य बोलले ते माझ्या अजूनही स्मरणात आहे कि “शुद्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी “ आणि यापेक्षा दुसरी शाबासकी आपल्या पालकांना काय असू शकते . किंवा काय पाहिजे.
प्रत्येकाच्या घरच्यांसाठी यश काय असते तर पहिला नंबर येणे यापलीकडे तरी नसेल असे मी मानतो. आणि माझ्या घरच्यांच्या बाबतीत तर इतके चांगले मार्क्स पडले हेच खूप मोठ होत. आणि त्यामुळे त्यांचा आनंददेखील खूप होता.
परंतु एक गोष्ठ आवर्जून सांगतो कि मी कुठल्याही फळाची अपेक्षा न करून प्रामाणिकपणे कर्म केले होते आणि त्याचे फळ नशिबाने आणि विधात्याने मला दिले असावे.
तुम्ही हुशारीत पुढे होताच परंतु थोडस नशिबात मागे पडला असावा अस मला वाटत.
त्या वर्षामुळ ,त्या निकालामुळ मी माझ्याच मनात असलेल्या न्यूनगंडला कदाचित बाहेर काढल असाव. मला सायन्सहि पेलवल कि नाही अशी शंका होती परंतु त्याच त्या क्षणाने प्रवाहात आत्मविश्वासाने वाहत राहिलो आणि आधी डिप्लोमा मग B.E. डिग्री आणि आता सर्व काही मॅनेज करून, पार्ट टाइम अभ्यास करून फायनल M.E. मास्टर डिग्री त्याच जोरावर मनोबल उंच करून पेलावत आहे. आणि यात त्या दहावीच्या वर्षाची भूमिका आणि तेव्हा मिळालेला विश्वास प्रेरणादायी ठरत आहे किंवा महत्वाची भूमिका बजावत आहे असे मी तरी मानतो.