क्षण .....
![]() |
ओंकारेश्वर ब्रिज,पुणे |
असं होत... जेव्हा आकाशात गर्द नभ दाटून येतात, जमिनीवरून नभाला साद घालणारी निळसर नदी आणि त्यासोबतीला तो सुंदर नजराना अनुभवणारे आपले नयन यांचे मनोमिलन एकाच वेळी होते....
अनेक आठवणी दाटून येतात,
मनावर त्या गर्द ढगांची सावली पडते,
मधेच त्यात हळूच गालावर स्मित हास्य उमटवनारी वाऱ्याची मंद झुळूक येते....कदाचित आपल्या जवळ अगदी काढावर जसे अगदी आपल्या अंगावर...!
मनावर त्या गर्द ढगांची सावली पडते,
मधेच त्यात हळूच गालावर स्मित हास्य उमटवनारी वाऱ्याची मंद झुळूक येते....कदाचित आपल्या जवळ अगदी काढावर जसे अगदी आपल्या अंगावर...!
कधी मधेच त्या काठावरच्या मंद हवेच्या आवाजातून दाटून येतात आठवणीचे अश्रू....
अचानक ओल्या अश्रुंवर पडतात कधीतरी नभांमधून वाट काढून आलेली ती सुंदर किरणे....
आणि त्यातून आपल्या त्वचेवर येणार अलगद शहारा...
अचानक ओल्या अश्रुंवर पडतात कधीतरी नभांमधून वाट काढून आलेली ती सुंदर किरणे....
आणि त्यातून आपल्या त्वचेवर येणार अलगद शहारा...
आणि मधेच झालेला नभांचा कडकडाट आणि सुरु झालेली ती रिमझिम पुन्हा आपल्याला भानावर सत्यतेत आणून ठेवती.. आणि नेहमीच्या सत्य गोष्टींना पुन्हा सुरुवात होते...नव्याने...!
कदाचित असंच झालं जेव्हा हा सुंदर क्षण जाणवला... आकाशात गर्द नभ दाटून आले तेव्हा...
✍गणेश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा