Pages

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

ऐतिहासिक महाश्रमदान…! १ मे २०१९

ऐतिहासिक महाश्रमदान…!
सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१९.
बुधवार, दिनांक १ मे २०१९
महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन आणि म्हसवंडीमध्ये महाश्रमदान दिन.
१७० महिला, २१० पुरुष त्यात लहान मोठे वृद्ध शाळकरी विद्यार्थी यांचा समावेश, १० बैल जोड्या, १५० टिकाव – फावडे, १५० घमेली हे सर्व घेऊन ४ पिकअप, अनेक मोटारसायकल, सायकल यांनी बरोबर सकाळी ९ वाजता श्रमदान ठिकाण गाठल.
यात गावातील सर्व संस्था सहभागी होत्या. आपली सर्व वाद विवाद बाजूला ठेऊन सर्व गावकरी श्रमदानासाठी एकवटले.
१०० महिला एका रंगाच्या साडीमध्ये,
निम्मे पुरुष तथा लेझीम मंडळ एका गणवेशामध्ये असे चित्र पंचतारांकित कार्यक्रमासाठी नाही तर महाश्रमदानासाठी.
एकजूट काय असते आणि यातून काय होऊ शकते याचा अगोरही जगाला संदेश देणाऱ्या म्हसवंडी गावाने आज या महाश्रमदातून पुन्हा इतिहास घडवला.
गेल्या दोन दशकातील सर्वात मोठं श्रमदान करून गावाला अधिक सक्षम आणि पाणीदार करण्यासाठी केलं गेलं.
अतिशय शिस्तबद्ध, नियोजयनयुक्त आणि खेळीमेळीच्या वातावरणात सर्वाधिक काळ हे श्रमदान चालले.
सकाळी बरोबर ९ वाजता सुरू झालेले श्रमदान बरोबर संध्याकाळी ५ वाजता संपले. यात गावकऱ्यांनी सर्वांसाठी जेवणाची देखील व्यवस्था केली होती.
अतिशय कडाक्याच्या उन्हात श्रमदान करताना सर्वांची स्थास्थ काळजी म्हणून दिवसभर फिल्टरयुक्त थंड पाण्याची आणि प्राथमिक मेडिकलची व्यवस्था केली होती.
आणि या सगळ्या गोष्टींची दखल घेतली जाणार नाही असेही होणार नाही त्यामुळे पानी फाउंडेशनच्या कोअर टीमचे डाटा आणि प्रॉडक्शन हेड स्वतः भेट देण्यासाठी आले होते.
तालुक्यातील सर्वच प्रशासकीय अधिकारी यांनी या श्रमदानाला भेट दिली आणि गावकऱ्यांचे मनोबल वाढवले.
यात मशीनकामासाठी मोलाची भर घातली ती संगमनेर भाग साखर कारखाना यांनी त्यांचे देखील खूप खूप आभार.
आजच महाश्रमदान म्हणजे नक्कीच एक तुफान आलं होतं हे नक्की.
गावकऱ्यांनी केलेलं काम खरंच खूप कौतुकास्पद आहे.
आजच हे महाश्रमदान नक्कीच इतर गावांना वेगळा आदर्श घालून देईल हे नक्की…!
सर्व सहभागी गावकऱ्यांना आणि त्यांनी केलेल्या कार्याला सलाम…!
तुफान आलया….🙏🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा