Pages

गुरुवार, २० जून, २०१९

पाऊस_ती_आणि_मी

#पाऊस_ती_आणि_मी

ओल्या त्या पावसात तुझी वाट पाहणं,
तू आले की किती उशीर केला म्हणून रुसणं।।

मग एकमेकांना सॉरी बोलून परत एक होणं,
ओल्या त्या पावसात ढगांच्या मागे फिरायला जाणं।।

धुक्यांच्या मागे जाऊन तुझ्या मिठीत येणं,
मिठीत घेऊन तू माझा हात हातात घेणं।।

हातावर ओठांचा हळुवार स्पर्श करत मला विचारणं,
तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?

मी पुन्हा हळुवार तुझा हात हातात घेऊन सांगणं,
का खरं वाटतं नाही का? माझं वागणं।।

तू हसून म्हणणं तुझ्या तोंडून ऐकायला आवडते णं,
मग पुन्हा दोघांनी हळुवार आवाजात प्रेमाचा इजहार करणं।।

आणि पुन्हा एकदा एकमेकांत मग्न होऊन जाणं,
पुन्हा त्या ओल्या पावसात.... तुझ्या मिठीत सांमावणं।।

मंद ओल्या त्या पावसात भिजताना.......☔

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

Trekkers Attraction दुरगुडी गुहा !!

Trekkers attraction

ट्रेकर्स साठी एक नवीन पॉईंट
पुणे आणि अहमदनगर जिल्याच्या सरहद्दीवर … आळेफाट्या पासुन ८ किलोमीटर अंतरावर , आदर्श गाव म्हसवंडी येथील पर्वतरांगामधे वसलेली …
दुरगुडी गुहा !!
या गुहेबद्द्ल –
सुमारे १२ फुट उंच आणि २० फुट खोल अशी ही गुहा आहे .
या गुहेचा आकार कमी कमी होत जातो आणि शेवटी एकदम अरुंद होतो जीथे कोनाला जाता येत नाही .
येथील स्थानिक ग्रामस्थ असं सांगतात की गुहा किती खोल आहे याचा कोनीच अंदाज लावु शकत नाही .
अनेकांनी या गुहेत घुसन्याचा प्रयत्न केला मात्र ठरावीक अंतर गेल्यानंतर परत माघारी फिरावे लागले कारण पुढे पुढे याचा आकार अतीशय कमी होत जातो .
गुहेची दर्शनी बाजु भव्यदिव्य आहे .
या जागेत जवळपास ३०-४० लोकं आरामात बसु शकतात .
पुर्वी लपण्यासाठी सुरक्षित जागा म्हणून लोक ह्या गुहेचा वापर करत .
स्थानिक ग्रामस्थ अशीही आख्यायिका सांगतात की शिवाजी महाराजांच्या राज्यात अहमदनगर वरुन जुन्नर ला जाताना या मार्गाचा वापर केला जायचा आणि रात्रीचा मुक्काम या गुहेत केला जायचा .
चहु बाजूंनी सह्याद्री पर्वत रांगा … त्यावरुन फेसाळनारे पांढरे शुभ्र धबधबे ,
धुक्याची चादर आणि वरुन कोसळनारा संतधार पाऊस
ह्या गुहेकडे जाताना या सगळ्याचा मनमोहक अनुभव येतो .
या ठीकाणी कसे पोहचावे –
मार्ग १ –
पुणे नाशीक हायवे वर बोटा हे गाव आहे .
बोटा येथुन पश्चिमेस म्हसवंडी हे गाव साधारण ८ किलोमीटर आहे
(आळेफाटा – बोटा – आंबीफाटा – म्हसवंडी )
मार्ग -२
नगर कल्याण हायवे वर पिंपरी पेंढार गाव आहे .
पिंपरी पेंढार गावातुन पुर्वेस म्हसवंडी साठी रस्ता मिळेल .
पिंपरी पेंढार पासुन म्हसवंडी साधारण ४ किलोमीटर आहे .
( हा रस्ता थोडा कच्चा आहे …. पण अंतर कमी आहे सावकाश वाहन चालवल्यास हा रस्ता उत्तम )
( आळेफाटा – पिंपरी पेंढार – म्हसवंडी )

या ठीकाणी आणखी काय पहालं
१) जागृत देवस्थान मळादेवी मंदिर आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परीसर
२) जिकडे नजर मारालं तीकडे सह्याद्री पर्वतरांगा, त्यावरून फेसाळनारे धबधबे , धुक्यातून डोकी काढनारे सह्याद्रिची सुळके
३) आणि मौज मज्जा या व्यतीरिक्त जर काही शिकायचे असेल तर म्हसवंडी गावात
पाणलोट प्रकल्प प्रशिक्षण , महीला सबलीकरण प्रशिक्षण केंद्र आहे .
( आजपर्यंत या ठीकाणी देशातल्या सर्व राज्यांच्या एक हजारहून अधिक अभ्यास सहलीच्या टीम येउन गेल्या आहेत , तसेच जवळ जवळ 50 हून अधिक देशाच्या विविध टीम येथे भेट देउन गेल्या आहेत )
टीप – या केंद्राला भेट द्यायची असेल तर आधी तसं कळवावे लागते
संपर्क –
दिलीप सातकर – 9763029634
शिवाजी बोडके – 9623747800
किरण शांताराम बोडके – 9172863757
नवनाथ ईथापे – 8286117475
ईथे गेल्यावर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या
– या गुहेकडे जान्यासाठी जो रस्ता आहे तीथे बाजुलाच तलाव आहे … पोहता येत नसेल तर यात उतरन्याचा उतावळेपणा करु नये .
– गुहेकडे जाताना स्थानिक ग्रामस्थांच्या पाउलवाटेवरूनच जावे … उगीच अवघड रस्ता शोधून धोका वाढवु नये .
एक दिवसाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर म्हसवंडी – दुर्गुडी गुहा हा बेस्ट पर्याय आहे .
एकदा भेट द्याच …!!