एक विकसनशील गाव म्हणून संगमनेर तालुक्यातील माझे गाव म्हसवंडीची आज ओळख आहे. एके काळी छान असलेले जंगल लुटलं आणि गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागली. पण पाणलोट उपचारांमुळे हे चित्र बदललं आहे. गाव विकासासाठी कास धरून पुढे जात आहे.
![]() |
म्हसवंडी |
गावकऱ्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणं हे सर्वांत मोठं आव्हानात्मक काम होतं. फादर बाकर आणि साखर कारखान्याला गावकऱ्यांचं मन वळवायला बरीच मेहनत घ्यावी लागली. कामाच्या शोधात, जगण्यासाठी मुंबईला गेलेल्या गावकऱ्यांना गावच्या विकासाची थोडीफार दृष्टी आली होती. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अनेक जाणकार महिलांनी कार्यक्रमाच्या जागृतीकरता अनेक प्रकारे प्रयत्न केले. त्यांना गावातील समाजकार्यासाठी झटणाऱ्या मंडळींची बहुमोलाची साथ मिळाली. अनेक व्यक्तींनी हे काम माझेच असे स्वीकारून म्हसवंडीच्या उद्धारात स्वतःला झोकून दिलं. चराईबंदीला सुरवातीला खूप विरोध झाला. कारण त्या काळी पशुपालन हा बऱ्याच जणांच्या चरितार्थाचा एकमेव व्यवसाय होता. पण हळूहळू त्यांच्या गळी ही गोष्ट उतरली. तीच गोष्ट कुऱ्हाडबंदीची. "वॉटर' संस्थेच्या संचालक डॉ. मार्सेला डिसोझा यांच्याशी या संदर्भात झालेल्या भेटीचा प्रसंग अजूनही गावकरी महिलांच्या लक्षात आहे. कुऱ्हाडबंदीची अट मागे घ्यावी याकरता डोळ्यांत पाणी आणून महिलांनी मनीषा मॅडमना (गावकऱ्यांनी मार्सेलाचं केलेलं नामांतर) विनवलं. पण गावाच्या भल्याकरता त्यांना कठोर निर्णय घेणं भाग होतं. त्यांनी कुऱ्हाडबंदी काही मागे घेतली नाही.

कुऱ्हाडबंदीमुळे जाळण्यासाठी लाकडे नसणार हा विचार करून महिला समितीच्या माध्यमातून सर्व गावामध्ये अल्प दरात गॅस कनेक्शन जोडनि करून दिली आणि महिला समितीचा एक स्वतंत्र गॅस विभाग तयार झाला.
हळूहळू पाण्याचे प्रमाण वाढू लागल्याने गावात सर्वच नगदी पिके घेऊ लागली त्यात कांदा हे प्रमुख पिक.
त्यासाठी लागणारी सर्वच व्यवस्था बी-बियाणे, खते ,बारदान हे सर्वच अल्प दरात चालू केले.
पुढे कांडप मशीन व्यवसाय, शेवई मशीन व्यवसाय असे लघु उद्योग विभाग वाढत गेले.
महिलांनी स्वताच्या पैशातून त्यांच्या कारभारासाठी एक प्रशस्थ इमारत उभी केली आणि तिला नाव दिले ‘महिला श्रमदानवास्तू’.
हळूहळू पाण्याचे प्रमाण वाढू लागल्याने गावात सर्वच नगदी पिके घेऊ लागली त्यात कांदा हे प्रमुख पिक.

पुढे कांडप मशीन व्यवसाय, शेवई मशीन व्यवसाय असे लघु उद्योग विभाग वाढत गेले.
महिलांनी स्वताच्या पैशातून त्यांच्या कारभारासाठी एक प्रशस्थ इमारत उभी केली आणि तिला नाव दिले ‘महिला श्रमदानवास्तू’.
फादर बाकर यांच्या विकास सूत्रीतलं सर्वांत महत्त्वाचं सूत्र होतं. पाणलोट उपचाराचं उजाड वन क्षेत्रातील 171 हेक्टर जागेवर वृक्ष लागवड करण्यात आली तर जवळपास 100 हेक्टर जागेवर गवती कुरणं व काही प्रमाणात झाडं लावली गेली. 367 हेक्टर क्षेत्रावर शेती बांध, समपातळी चर घालून वाहून जाणाऱ्या माती-पाण्याला अटकाव करण्यात आला. गावातून जाणाऱ्या नाल्यावर नाला बांध, जाळीचे बांध आणि चेक डॅम घालण्यात आले. पळणारं पाणी तांबू लागलं, थांबलेलं पाणी जिरू लागलं. विहिरींची संख्या दुप्पट झाली, आटलेल्या विहिरांना नव्याने पाझर फुटले. वीस वर्षांत शेतीखालील क्षेत्र पाच पटींनी वाढलं. जेथे जेमतेम तीन महिने शेतीची कामं चालत; तेथे आज वर्षभर हात कामात गुंतलेले असतात.
मळादेवी महिला विकास समिती,म्हसवंडी |
पाणलोटाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा वसा आजही म्हसवंडीतील पुढील तरुण पिढी चालवत आहे.
वृक्षांनी व हिरव्यागार वनराईने संपन्न असलेल्या गावात आजही तेथील तरुण स्वखर्चाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन यांसारखे उपक्रम राबवत आहे. हेच म्हसवंडीचे काम पाहण्यासाठी जगभरातून लोक येत आहेत आणि यातच म्हसवंडीच्या प्रत्येक नागरिकाचे समाधान आहे.
वृक्षांनी व हिरव्यागार वनराईने संपन्न असलेल्या गावात आजही तेथील तरुण स्वखर्चाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन यांसारखे उपक्रम राबवत आहे. हेच म्हसवंडीचे काम पाहण्यासाठी जगभरातून लोक येत आहेत आणि यातच म्हसवंडीच्या प्रत्येक नागरिकाचे समाधान आहे.
महिला बचत गट व पाणलोट उपचाराच्या कामाने गावात फक्त समृद्धीच आणली असं नाही, तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महिलांमध्ये एकजूट झाली आहे, एक नवा आत्मविश्वास जागा झाला आहे, त्यांच्यात नेतृत्व विकास पावत आहे. विकास आणि पर्यावरणरक्षण हातात हात घालून कसे पुढे जाऊ शकतात, याचा हा एक वस्तुपाठच म्हणता येईल.......!
![]() |
नयनरम्य मळादेवी मंदिर, म्हसवंडी |